झाडाखाली बसलेल्या तिघांना ट्रकने चिरडलं
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 25 Nov 2016 04:14 PM (IST)

औरंगाबाद: विचित्र अपघाताने औरंगाबादेत दोघांची जीव गेला आहे. सिल्लोड-औरंगाबाद मार्गावर बनकिन्होळा जवळ ट्रकनं 3 जणांना चिरडलं. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं झाडाखाली बसलेल्या तिघांना उडवलं. या अपघातात दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.