सिद्धीविनायकाचरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे वेळोवेळी या दागिन्यांचा लिलाव केला जातो. आज होणारा लिलाव सकाळी 11 वाजता सुरु होईल. हा लिलाव दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. यापूर्वीचा लिलाव अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर एप्रिलमधे करण्यात आला होता..वर्षभर गणपती बाप्पाला नवसाचे आणि दान म्हणून आलेल्या दागिने लिलावाच्या माध्यमातून विक्रीसाठी ठेवले जातात.
या लिलावामध्ये बाप्पाच्या चरणी वाहिलेल्या विविध आकारातील सोन्याच्या अंगठ्या, प्रतिमा, लॉकेट, दुर्वा, सोन्याच्या साखळ्या, हार आदींचा समावेश असतो. भाविक बाप्पाचा प्रसाद म्हणून लिलावात मोठ्या उत्साहानं भाग घेतात आणि यावर्षीही हीच अपेक्षा सिद्धीविनायक न्यासाकडून व्यक्त करण्यात आली आहे.