मुंबई : सरकारकडून मराठ्यांना स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णय दिल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच अजय बारसकर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. यानंतर आता मराठा समाजाच्या रोषाला अजय बारसकर यांना जावं लागलं आहे. अजय बारसकर यांच्यावर आज मुबंईत हल्ल्याचा प्रयत्न झाला.
बारसकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली
बारसकर यांच्याविरोधात मराठा समाजातील पाटील समर्थक मराठा बांधव त्यांचा विरोध करत आहेत. आज (23 फेब्रुवारी) चर्चगेट परिसरामध्ये बारसकर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती बारसकर यांनी दिली. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर बारसकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अजय बारसकरांची 'प्रहार'मधून हकालपट्टी
दरम्यान, मराठा आंदोलनावरून मनोज जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या अजय महाराज बारसकर यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी हा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे हे खोटं बोलतात, ते हेकेखोर आहेत, त्यांचा कारभार पारदर्शक नसून ते गुप्त मिटिंग घेतात असा आरोप अजय बारसकर यांनी केला होता. अजय बारसकर यांची भूमिका मान्य नसून त्यांचा आता प्रहार संघटनेशी संबंध नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन आणि मराठा आरक्षण विषयी कोणीही भूमिका मांडू नये असे आदेश प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांची प्रहार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठा आरक्षणा विषयी बोलणारे अजय बारसकर यांना प्रहार संघटना आणि प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. अजय बारसकर यांची मराठा आंदोलना विषयीची भूमिका मान्य नाही आणि त्यांचे समर्थन प्रहार करत नाही असं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप, हा भोंदू महाराज
दुसरीकडे, अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला.
इतर महत्वाच्या बातम्या