लातूर : गाडीला धक्का देऊन पुढे जाणाऱ्याला जाब विचारल्याच्या रागातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये लातूरचे माजी महापौर अख्तर शेख जखमी झाले.


नेमकं काय झालं?

माजी महापौर अख्तर शेख यांच्या मुलाच्या गाडीला धक्का देऊन जाणाऱ्याला जाब विचारला असता, 10 ते 15 जणांच्या टोळक्याने काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. काझी मोहल्ल्यात जो कुणी दिसेल, त्याला हे टोळकं मारहाण करत होतं.

या मारहाणीत लातूरचे माजी महापौर अख्तर शेख हे सुद्धा जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

अख्तर शेख हे लातूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना महापौर होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, या मारहाणीच्या घटनेबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.