अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणला दाखल झाले आहेत. जनलोकपालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णांचा दुसर्‍या टप्प्यातील दौरा संपन्न झाला. अण्णांनी पाच राज्यात सतरा दिवसीय दौरा पूर्ण केला. एक जानेवारीपासून अण्णा तिसर्‍या टप्प्यातील दौऱ्याला कर्नाटकपासून सुरुवात करणार आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी दिल्लीत आंदोलनाचा ईशारा दिला आहे. 23 मार्चला शहीद दिनाला अण्णा आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यासाठी अण्णांनी नऊ डिसेंबरपासून दुसर्‍या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली होती.

या दौऱ्यात अण्णांनी दक्षिण आणि पूर्व ईशान्यसह सहा राज्याचा सतरा दिवसाचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात अण्णांनी लोकपाल, लोकायुक्त, निवडणूक सुधार आणि शेतकर्‍यांच्या समस्यांवर मार्गदर्शन केलं.  सर्वच ठिकाणी अण्णांचं उत्स्फूर्त स्वागत करुन सभांना मोठा प्रतिसाद मिळालाय.

दौऱ्याची सुरुवात अण्णांनी तामिळनाडूपासून केली. त्यानंतर दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाम, अरुणाचल, बिहार आणि राजस्थानचा दौरा केला. तर एक जानेवारीपासून अण्णा तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात करतील.

कर्नाटकला एक जानेवारीला जाहीर सभांना मार्गदर्शन करतील त्यानंतर अण्णा महाराष्ट्रात काही जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. त्यानंतर पुन्हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कर्नाटक आणि हैदराबाद दौऱ्यावर अण्णा रवाना होणार आहेत.

संबंधित बातमी :

या आंदोलनात मागण्या मान्य न झाल्यास प्राणाची आहुती : अण्णा हजारे