धुळे : धुळ्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली आहे. ज्यावेळी आंदोलकांनी गाडी फोडली त्यावेळी स्वत: हिना गावित त्या गाडीमध्ये होत्या. आंदोलकांनी गाडीवर चढत गाडीच्या काचेची तोडफोड केली.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेलं आहे. सरकारसोबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी आता लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचाच फटका भाजप खासदार हिना गावित यांना बसला.

आंदोलकांनी धुळ्यात हिना गावित यांची गाडी फोडली. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्जही करावा लागला. तसंच 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.