अहमदनगर : शिर्डीमध्ये वाळुतस्करांनी कोतवालावर प्राणघातक हल्ला केला आहे. कोल्हार भगवती गावात आज ही घटना घडली आहे. या मारहाणीत कोतवाल गंभीर जखमी झाला आहे.


शिर्डीजवळच्या कोल्हार भगवती गावात वाळूतस्करांनी कोतवाल राजेंद्र गायकवाड यांना बेदम मारहाण केली आहे. वाळुची गाडी पकडल्याच्या रागातून ही मारहाण झाली आहे. कोतवालासह आणखी एका व्यक्तीलाही मारहाण करण्यात आली आहे.

कोतवालाला मारहाण झाल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आरोपी अद्यापही मोकाटच आहे. गेल्या काही दिवसांत वाळुतस्करांची दहशत सर्वत्र वाढलेली दिसत आहे.