नंदुरबार: नोटांच्या वादामुळे 60 लोकांनी जीव गमावला, त्या सर्वांना सरकार शहीद घोषित करणार का? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विचारला. ते शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत बोलत होते.


सध्या संपूर्ण राज्यात नगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांनिमित्तच नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची प्रचार सभा पार पडली. यावेळी नेहमीप्रमाणेच विरोधकांवर टीका केली. तसेच शहादा नगरपालिकेत काँग्रेस पक्षाची सत्ता कायम ठेवा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले की, ''महाराष्ट्र बिघडत चालला आहे. नोटांच्या वादामुळे ६० लोकांनी जीव गमावला सरकारची भूमिका काय आहे.''

काँग्रेसच्या कार्यकाळावर बोलताना ते म्हणाले की, ''काँग्रेसचे सरकार निर्णय घ्यायचे, पण जनतेला त्रास झाला, तर निर्णय माघे ही घेत असे. पण सध्याचे सरकार मुस्कटदाबी करून चालविले जात आहे.''

चव्हाण पुढे म्हणाले की, ''धुळे आणि नंदुरबार काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे विरोधकांची डाळ शिजणारा नाही. सेना भाजप आणि एम.आय.एम यांनी मतांचे वर्गीकरण करण्याकरता राज्यात उमेदवार उभे करतात बाकी काही होत नाही,'' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.