लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पानिपत झाले असले तरी राज्य काँग्रेसमध्ये बदलाची मानसिकता नसल्याचे पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण विधानसभा निवडणुकीत राज्य काँग्रेसचे नेतृत्व करणार आहेत. विशेष म्हणजे चव्हाणांनी त्यासाठी कामदेखील सुरु केले आहे.
येत्या काही महिन्यांमध्ये(चार ते पाच) विधानसभा निवडणूक होईल. निवडणुकीला खूप कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीमध्ये कोणताही नेता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. त्यामुळेच अशोक चव्हाणांना आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य काँग्रेसची जबाबदारी पेलावी लागणार आहे.
दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे पक्षाला लवकरच या पदासाठी नवी निवड जाहीर करावी लागणार आहे. आज राहुल गांधी यांनी स्वत:च या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? आणि कधीपर्यंत नव्या अध्यक्षांची निवड जाहीर होणार? यावर सर्वत्र चर्चा सुरु आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काँग्रेस फोडण्याच्या प्रयत्नात, अशोक चव्हाणांचा आरोप | ABP Majha
राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीकडे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा सोपवल्यापासून 26 दिवस उलटले आहेत. परंतु नवा काँग्रेस अध्यक्ष कोण असणार? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. काही हिंदी वृत्तपत्रांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे पुढील काँग्रेस अध्यक्ष होतील, अशी बातमी प्रसिद्ध केली आहे. परंतु तूर्तास तरी पक्षात अशी कुठलीही हालचाल नसल्याचे राहुल गांधींनी स्पष्ट केले आहे.
25 मे रोजी अशोक चव्हाणांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल होता