Maratha Reservation :  मराठा आरक्षणासंदर्भात सध्या विविध मागण्या केल्या जात आहेत. दुसरीकडे जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. मात्र हा विषय आता केंद्र सरकारशी संबंधित आहे. केंद्राने घटनात्मक दुरुस्ती केल्याशिवाय मराठा आरक्षण मिळू शकत नाही असं, मराठा आरक्षण उपसमीतीचे माजी अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं आहे. पण मराठ्यांना तसं आरक्षण देताना हा हिशोब 50 टक्यांवर चालले आहे. आरक्षण 50 टक्यांवर जात असल्याने घटना दुरुस्ती केल्या शिवाय पर्याय नाही, असा उल्लेख पवार साहेबांनी देखील केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. Ews मध्ये 10 टक्के आरक्षण दिलं, त्याच पद्धतीने ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.


मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र द्याल , पण उर्वरित महाराष्ट्राचं काय ? हा विषय देखील कायदेशीर - अशोक चव्हाण 


मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारने सूरु केली आहे. मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने  दाखले आहेत. पण उर्वरित महाराष्ट्राचं काय? असा प्रश्न माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. शिवाय हा विषय देखील कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता आहे. यावर पुन्हा न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं, असं अशोक चव्हाण म्हणाले .... 


जातिनिहाय जनगणना ही काँगेसची जाहीर मागणी - अशोक चव्हाण 


मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.. त्यांचा मागणीला माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी पाठिंबा दिला आहे. जातिनिहाय जनगणना करण्याची काँगेसची जाहीर मागणी आहे. काय परिस्तिथी आहे ते देशासमोर येईल, असे अशोक चव्हाण म्हणाले. 


आरक्षण आणि दुष्काळ दोन्ही विषय गंभीर , अधिवेशन बोलवून निर्णय झाला तर योग्य - अशोक चव्हाण 


आरक्षण आणि दुष्काळ हे दोन्ही विषय फार गंभीर आहेत. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून हे विषय गांभीर्याने घ्यावेत. डिसेंबरमध्ये अधिवेशन आहे .. त्यापूर्वी अधिवेशन बोलावून निर्णय झाले तर योग्य होईल अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली .... 


इंडिया - भारत वाद करायच कारण नाही - अशोक चव्हाण 


इंडिया नाव बदलून भारत  करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र इंडिया - भारत वाद करायचं कारण नाही. भाजपाच्या अनेक घोषणा , योजना इंडिया नावाने आहेत. मग त्याचं काय करायचं ? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. इंडिया नावावरुन अचानक भूमिका बदलण्याचं कारण काय? असं अशोक चव्हाण म्हणाले.