पुणे : कविवर्य मोरोपंतांच्या कर्मभूमीत विसावा घेतल्यानंतर संत तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडीत दाखल झाली. याठिकाणी प्रसिद्ध मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. हजारो भाविकांना हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. आज तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम सणसरमध्ये असेल, तर ज्ञानोबा माऊलींची पालखी तरडगावमध्ये मुक्कामी असेल.


मेढ्यांची रोगराई जाण्यासाठी तुकाराम महाराजांच्या पालखीभोवती काटेवाडीतील एका मेंढपाळानं मेढ्यांचं रिंगण घातलं होतं. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा काटेवाडीतील मेंढपाळांनी कायम जपली आहे. रिंगण सोहळा पार पडल्यानंतर वारकऱ्यांनी फुगडीही घातली.

काटेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पवार कुटूंबियांकडून स्वागत करण्यात आलं. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत पवार कुटुंबीयांकडून   करण्यात येते. ही परंपरा यापुढेही कायम ठेवणार असल्याचे पार्थ पवार त्यांनी सांगितलं आहे.

त्यांनी सोहळ्यात पायी चालत आणि तुकोबारायांची पालखी खांद्यावर घेत वेशीपासून विसाव्यापर्यंत नेली.

वारीमध्ये मेंढ्यांचे रिंगण

पूर्वी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जात असताना काटेवाडी येथील मेंढपाळाने मेंढ्यांची रोगराई जाण्यासाठी पालखी रथाभोवती मेंढ्यांचे रिंगण घातले होते. तेव्हापासून ही आगळीवेगळी परंपरा भाविकांनी श्रद्धेने जपली आहे.