Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज आंथुर्णेहून निमगाव केतकीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. इंदापूरमधल्या गुरुवारच्या रिंगणाआधी तुकोबारायांची पालखी निमगाव केतकीमध्ये मुक्काम करणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखील्या वारकऱ्यांचं निमगाववासियांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलं. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने तरडगावचा मुक्काम आटपून फलटणकडे प्रस्थान ठेवलं आहे. ज्ञानोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम फलटणमध्ये असणार आहे.


निमगाव केतकी हे गाव विड्याच्या पानाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. या गावात पालखी मुक्कामाला आल्यावर निमगाववासियांनी परंपरेनुसार पानं वाटली. आपल्या गावाची वारकऱ्यांना आठवण राहावी म्हणून ही पानं वाटण्यात येतात. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीनं तरडगावहून हरीनामाच्या गजरात फलटण गाठलं. माउलींची पालखी गावात दाखल झाल्यावर फलटणवासीयांकडून माउलींचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकीतून गुरुवारी पहाटे निघून इंदापूरमध्ये दाखल होईल. तिथं भव्य रिंगण पार पडेल. वारकरी आणि ग्रामस्थांसाठी हा अनुभव म्हणजे मोठी पर्वणी असते.


मागील 10 दिवसांपासून संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विठ्ठाची आस धरुन प्रवास करत आहे. या पालखीसोबत हजारो वारकरी ऊन वारा अंगावर घेत विठुरायाचं नामस्मरण करताना दिसत आहे. ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गजर करताना दिसत आहे. वाटेत अनेक वारकरी आपल्या मोबाईलमध्ये वारी आणि पालखी टिपत आहेत. मात्र या सगळ्यांच्या चेहऱ्या विठुरायाच्या पंढरीची आस लागलेली दिसत आहे. आता वारकऱ्यांचा सात दिवसांचा प्रवास शिल्लक आहे. यात सात दिवसात वारकरी दमलेल्या अवस्थेत असला तरी विठुराया आम्हाला उर्जा देतो, असं म्हणत वारकरी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होताना दिसत आहे. राज्यभरातून निघालेल्या दिंड्यामध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. आबालवृद्धांसह महिला वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी आहेत. लांबवरुन दिसणाऱ्या भगव्या पताका, दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरु असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. 


सुख दु:ख विसरुन वारकरी वारीत दंग...



शेतकरी वर्ग वारीत मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे या सगळे बळीराजा विठुरायाकडे शेतीसाठी साकडं घातल आहे. यंदा पाऊस लांबल्याने शेतकरी पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. विठ्ठला सगळं सुजलाम सुफलाम होऊ दे, असं म्हणत वारकरी एक एक पाऊल टाकताना दिसत आहे.