Ashadhi wari : संसार पंढरी आम्ही वारकरी , अगा पांडुरंगा सुखी ठेव सारी असे म्हणत  सर्वांच्या  सुखासाठी प्रार्थना करत वारकरी  पंढरीच्या दिशेनं जात आहेत. माऊलींच्या पालखीचा आज  फलटण  येथे  मुक्काम असणार आहे. त्यानंतर . तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा  पालखी सोहळा आज निमगाव केतकी येथे असणार आहे.

  


तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा निमगाव केतकीमध्ये


विठूनामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दरमजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा निघाला आहे त्यामुळे वारकऱ्यांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सकाळी अंथुरणेवरून निमगाव केतकीकडे प्रस्थान ठेवले आहे. 


संत श्रेष्ठ माऊली महाराजांची पालखी आज फलटणमध्ये


विठूनामाच्या गजरात 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू आळंदीहून प्रस्थान करण्यात आले. तब्बल दोन वर्षांनंतर पालखी सोहळा असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील अनेक पालख्या पायी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेतत. त्यानुसार पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन माऊली महाराजांचा पालखी सोहळा आता सातारा जिल्ह्यातून जात आहे. आज ऐतिहासिक फलटण शहरामध्ये माऊली महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे


कोरोनामुळे गेली दोन वर्ष वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र, परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावांत वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.


संबंधित बातम्या :


Ashadhi Wari 2022 : पंढरीतील तुळशीमाळेचे मार्केट आषाढीसाठी सज्ज, चायना माळेपुढे खरी तुळशीमाळ कशी ओळखाल?


Ashadhi Wari 2022 Special : आषाढी यात्रेसाठी मूर्तींची बाजारपेठ सज्ज, शेकडो सुबक दगडी मूर्ती विक्रीसाठी तयार