Ashadhi Wari 2022 Pandharpur : कोरोनामुळं गेली दोन वर्ष आषाढी पायी वारीच्या (Ashadhi Wari) सोहळ्यात खंड पडला. पण आता कोरोना आवाक्यात आलाय, म्हणूनच शासनाने सर्व निर्बंध हटवले आहेत. यंदाच्या आषाढी वारीसाठी गजानन महाराजांच्या पालखीचे 6 जूनला प्रस्थान होणार आहे. पालखीचे हे 53 वे वर्ष असून पालखीत शेगाव येथून 700 भाविक सामील होणार आहेत. आळंदी येथून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे प्रस्थान 21 जूनला तर संत तुकारामांच्या पालखीचे प्रस्थान 20 जूनला होणार आहे. 


आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम 


गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान  6 जूनला सो दिनांक 21 जून रोजी सकाळी 7 वाजता  मंदिरातून प्रस्थान होणार आहे. पाच जिल्हे आणि 750 किमीचे अंतर पायी चालत पालखी 8 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहचणा आहे.  सोमवार 6 जून पारस, मंगळवार 7 जून भौरद, 8 आणि 9 जून अकोला, 10 जून वाडेगाव,11 जून पातूर, 12 जून श्री क्षेत्र डव्हा, 13 जून शिरपूर जैन, 14 जून म्हसला पेन, 15 जून रिसोड, 16 जून सेनगाव, 17 जून डिग्रस, 18 जून जवळा बाजार, 19 जून श्री क्षेत्र त्रिधारा, 20 जून परभणी, 21 जून दैठणा, 22 जून गंगाखेड, 23 जून परभणी, 24 जून परळी वैजनाथ, 25 जून अंबाजोगाई, 26 जून बोरी सावरगाव, 27 जून कळंब, 28 जून तेरणा साखर कारखाना, 29 जून उपळा, 30 जून उस्मानाबाद, 1 जुलै तुळजापूर, 2 जुलै ऊळे, 3 आणि 4 जुलै सोलापूर, 5 जुलै तिऱ्हे, 6 जुलै माचणूर, 7 जुलै मंगळवेढा तर शुक्रवार 8 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल.  तर 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. 8  ते 12 जुलै  पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे.13 जुलैला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. सुरक्षेच्या कारणामुळे पालखीच्या नियमात अनेक बदल करण्यात आले आहेत.


कोरोनामुळं गेली दोन वर्षे वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आलं नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला. मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षाचा कठीण काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या थाटामाटात ही आषाढी वारी साजरी करण्यासाठी वारकरी उत्सुक झाले आहेत. गावागावात वारकऱ्यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता सर्व वारकऱ्यांना पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची आस लागलेली आहे.


संबंधित बातम्या :


 Nivruttinath Dindi : भेटी लागे जीवा! 27 दिवसांचा पायी प्रवास, अन विठुरायाचं दर्शन