रत्नागिरी : जिल्ह्यातील राजीवडा भागात कोरोनाचा रूग्ण सापडला आहे. मर्कजला गेलेल्या आणि त्यानंतर 18 मार्चला रत्नागिरीत गेलेल्या रूग्णाला कोरोना झाल्याचे शुक्रवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. सध्या मर्कजला गेलेले पाचजण जिल्हा रूग्णालयात क्वॉरंटाईन करून ठेवण्यात आले आहेत. राजीवडामधील रूग्ण सापडल्यानंतर त्या भागात आशा वर्कसकडून जनजागृती केली जात आहे. मात्र, जनजागृती करताना एका नगरसेवकाने धमकावल्याचा आरोप आशा सेविकांनी केलाय. 'आज सर्व्हे केल्यास उद्याचा माहोल वेगळा असेल' अशी धमकी बिजली खान या माजी नगरसेवकाने दिली.


राजीवडामधील रूग्ण 18 मार्चपासून अनेकांच्या संपर्कात आला असल्यामुळे सर्वांची तपासणी केली जात आहे. त्याकरता या भागामध्ये आशा वकर्स घरोघरी जात नागरिकांशी संवाद साधत त्यांना कोरोनासदृश्य लक्षणे दिसत आहेत का? याची चौकशी करत आहेत. पण, या सेविकांना 'आज सर्व्हे केल्यास उद्याचा माहोल वेगळा असेल' अशी धमकी बिजली खान या माजी नगरसेवकांने दिली. त्यानंतर घाबरलेल्या परिस्थितीत आशा वकर्स जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ परत आल्या. या साऱ्या प्रकरणाची दखल खुद्द पोलीस आयुक्तांनी देखील घेतली. त्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे राजीवडा या भागात गेले आणि त्यांनी बिजली खान या नगरसेवकाला ताब्यात घेतले. यावेळी 'नागरिकांनी हकार्य करावे. हे सर्व तुमच्याच भल्यासाठी सुरू आहे. आशा सेविकांना सहकार्य करा. या ठिकाणी कुणीही अतिरेक केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल' असा इशारा पोलीस अधिक्षकांनी दिला.


कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे


दीड किमीचा परिसर सील
राजीवडा परिसरातील रूग्ण कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आल्यानंतर प्रशासनानं तातडीने सुत्र हलवली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दीड किमीचा परिसर सील करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढील 15 दिवस आता या परिसरातील एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट सील करण्यात आले आहेत.


लातूरमध्ये आठ मुस्लीम यात्रेकरूंना कोरोनाची लागण; उत्तर भारतातून दक्षिणेकडे सुरू होता प्रवास


रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकवर
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दोन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली आहे. पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाचे दोन्ही रिपोर्ट हे निगेटीव्ह आले आहेत. पण, त्यानंतर अवघ्या चार दिवसानंतर रत्नागिरीमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रूग्ण समोर आला आहे. त्यामुळे रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या ही पुन्हा एक झाली आहे. दरम्यान, सध्याची स्थिती पाहता नागरिकांनी घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा कमी पडणार नाही. अशी ग्वाही देखील यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.


CM Uddhav Thackeray | डॉक्टर, नर्सेससोबत गैरवर्तन कराल तर खबरदार : उद्धव ठाकरे