खोपोली: जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे.
83 वर्षीय आसारामला (Asaram Bapu) सप्टेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास खोपोलीतील माधवबाग आयुर्वेदिक येथे आणण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाराम पुढील सात दिवस उपचारासाठी या वैद्यकीय सुविधेत राहणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. रायगड पोलिसांनी तेथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला (Asaram Bapu) ह्रदयविकाराचा त्रास होत होता. आसाराम बापूला (Asaram Bapu) येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याला कोर्टाने त्याला खोपोलीत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.
पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी घातल्या होत्या, ज्यात त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवास करतील, त्याला सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती. त्याला खोपोलीतील एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार व वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च त्याला करावा लागणार आहे. आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेला स्थगिती देण्याची आसारामची (Asaram Bapu) याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती.
रुग्णालयात पोहोचताच पॅरोलचा कालावधीची मोजणी सुरू
पॅरोलचा कालावधी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यापासून मोजला जाईल, जोधपूर पोलिसांनी त्याला मंगळवारी कारागृहातून विमानतळावर नेण्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली आहे. डीसीपी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, आसारामच्या (Asaram Bapu) म्हणण्यानुसार, जोधपूर पोलिसांचे उपनिरीक्षक भंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलिस त्याच्यासोबत असतील. आसारामच्या वतीने पॅरोलसाठी अनेकवेळा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र प्रथमच 13 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नारी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूर एम्सच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे सात दिवसांचा पॅरोल दिला होता.