अहमदनगर : कलातपस्वी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओला लागलेल्या आगीत मोठी कलासंपदा खाक झाली. महाराष्ट्रभरातून हळहळही व्यक्त झाली. पण त्यापुढे जाऊन ज्येष्ठ कलाकारांनी प्रमोद कांबळेंच्या स्टुडिओची नव्यानं निर्मिती करण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं.


दगडात जीव ओतणारा हा जादूगार अर्थात प्रमोद कांबळे. काल 1 वाजण्याच्या सुमारास नगरमधील त्यांच्या स्टुडिओला आग लागली. ज्यात अनमोल शिल्पं, चित्रं, कलाकृती खाक झाल्या. 20 वर्षांची तपश्चर्या अवघ्या काही मिनिटात बेचिराख झाली. पण ही वेदना बाजूला ठेऊन ज्येष्ठ कलाकारांनी प्रमोद कांबळेंच्या पंखांना बळ देण्याचं आवाहन केलं आहे.

साठीच्या दशकात ए. ए. आलमेलकरांच्या स्टुडिओला लागलेल्या आगीनंतर त्यांना मुकुंदराव किर्लोस्करांनी दिलेल्या सल्ल्याचीही आठवण प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकरांनी करुन दिली.

VIDEO : सुहास बहुळकर यांनी काय आवाहन केले?