जळगाव : एकनाथ खडसेंच्या बदनामी खटल्यात अंजली दमानिया यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झालं आहे. रावेर कोर्टाने सांताक्रूझ पोलिसांना याबाबतचे आदेश दिले आहेत.


अंजली दमानियांनी जळगावात येऊन एकनाथ खडसेंच्या जावायाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा करणे, कार्यकर्त्यांचे लाच प्रकरण आदीवरुन त्यांच्यावर बेछूट आरोप केले होते. यातील भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

यानंतर त्यांच्या चौकशीसाठी सरकारने निवृत्त न्यायाधिश झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली होती. पण चौकशीचा अहवाल निरर्थक असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. यानंतरच एकनाथ खडसेंचे समर्थक आणि भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्यावरुन, अंजली दमानियांविरोधात रावेर कोर्टात दावा केला होता.

या खटल्याच्या सुनावणीसाठी रितसर समन्स प्राप्त पाठवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे आज अखेर त्यांच्या विरोधात न्यायाधिशांनी अटक वॉरंट जारी केले.

संबंधित बातम्या

एकनाथ खडसेंबाबत झोटिंग समितीचा अहवाल निरर्थक : मुख्यमंत्री

खडसेंच्या चौकशीसाठी नेमलेल्या झोटिंग समितीवर 45 लाख रुपये खर्च!

भोसरी जमीन खरेदी प्रकरण, खडसेंची झोटिंग समितीसमोर हजेरी