अंजली दमानियांविरोधात अटक वॉरंट जारी
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव | 13 Apr 2018 09:20 PM (IST)
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे.
जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भाजप नेते एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अंजली दमानिया सतत गैरहजर राहत असल्यानं रावेर न्यायालयानं त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान एकनाथ खडसे आणि भाजपची नाहक बदनामी केल्याप्रकरणी रावेरचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील यांनी अंजली दमानियांविरोधात याचिका दाखल केली होती.