VIDEO : एसटी चालवताना चालक व्हॉट्सअॅपमध्ये गुंग
एबीपी माझा वेब टीम | 13 Apr 2018 07:30 PM (IST)
एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देतं. मात्र, याच महामंडळाचा चालक बस चालवताना मोबाईल फोनवर चक्क व्हॉट्सअॅप हाताळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पैठण : एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेची हमी देतं. मात्र, याच महामंडळाचा चालक बस चालवताना मोबाईल फोनवर चक्क व्हॉट्सअॅप हाताळतानाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैठण-जालना बसमध्ये हा प्रकार घडला आहे. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. मात्र, चालत्या बसमध्ये चालकाला मोबाईलवर व्हॉट्सअॅप आणि फेसबूक पाहण्याचा मोह आवरता आला नाही. दरम्यान, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. चालक महाशयांना चालत्या बसमध्येच फेसबुक, व्हॉट्सअॅप पाहण्याची लहर आली आणि बस सुरु असतानाच मोबाइल हाताळण्यास सुरुवात केली. यावेळी चालकाची कधी नजर रस्त्यावर तर कधी मोबाईलवर होती. सुदैवाने हा बसला कोणताही अपघात झाला नाही. मात्र, अशा बेफिकीरपणे बस चालवणाऱ्या चालकावर काही कारवाई होणार का? असा सवाल आता नागरिक विचारु लागले आहेत. VIDEO :