जालना: बनावट सोन्याला खरे सोने भासवून ग्राहकांची फसवणूक केल्याची घटना जालन्यात समोर आली आहे. फसवणूक करण्याऱ्या राजस्थानमधील एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ईश्वर वाघरी असे या आरोपीचे नाव आहे.
ईश्वर वाघरी हा जालन्यातील लोकांना सांगायचा की, एकाला गुप्तधन सापडले आहे. तसेच आपल्याकडे अर्ध्या किमतीत हे सोने उपलब्ध आहे. याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचत छापा टाकून आरोपीला अटक केली.
आरोपीकडून पोलिसांनी काही दागिने जप्त केले आहेत. त्यासोबतच त्याच्याकडून सोन्याचा मुलामा दिलेले एक किलो 300 ग्रॅम बनावट सोने जप्त केले. तसेच पोलिसांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, सतर्क रहाण्याचे आवाहन नागरिकांना केले.
जालन्यात बनावट सोन्याचे दागिने विकणाऱ्या आरोपीस बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2018 05:35 PM (IST)
आरोपीकडून पोलिसांनी काही दागिने जप्त केले आहेत. त्यासोबतच त्याच्याकडून सोन्याचा मुलामा दिलेले एक किलो 300 ग्रॅम बनावट सोने जप्त केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -