'राजधानी'मध्ये जवानाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे सहकारी जवान जखमी
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2018 08:35 AM (IST)
दरम्यान बंदुकीची गोळी चुकून चालली की, जाणीवपूर्वक झाडली याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रतिनिधिक फोटो
बिलासपूर : सैन्यातील जवानाच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे त्याचाच सहकार जखमी झाला आहे. मध्य प्रदेशमधील आमला स्टेशनदरम्यान बिलासपूर-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी रात्री ही घटना घडली. जवानाच्या बंदुकीतून सुटलेली गोळी त्याच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. जखमी सहकारी जवानाला आमलामधील हवाई दलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान बंदुकीची गोळी चुकून चालली की, जाणीवपूर्वक झाडली याचा तपास पोलीस करत आहेत. बिलासपुर-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस नागपूरवरुन दिल्लीच्या दिशेने जात होती. ट्रेन रात्री पावणे अकराच्या सुमारास आमला स्टेशनवर पोहोचली. त्यावेळी जवानाच्या पिस्तूलमधून गोळी सुटून ती सहकारी जवानाच्या पायाला लागली. रेल्वे पोलीस जवानाची चौकशी करत आहेत.