CM Eknath Shinde : कालपासून मुंबईत मोठा पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पण याकाळात मुंबई महापालिकेनं सकाळपासून चांगलं काम केलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करण गरजेच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एनडीआरएफ टीमशीही मी बोललो आहे. याशिवाय आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स यांनाही सज्ज राहण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मी राज्याच्या डिझास्टर कंट्रोल रुममध्येही जाऊन आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळी जिथं पाणी साचलं होतं तिथं आता रस्ते आणि रेल्वे सुरु
आज आम्ही 5 हजार हॉटस्पॉट शोधून काढले आहेत. तिथं पालिकेचे अधिकारी तैनात केले आहेत. आता पाण्याचा निचरा सुरू झाला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सकाळी जिथं पाणी साचलं होतं तिथं आता रस्ते आणि रेल्वे सुरु झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सगळेजण मिळून काम करत आहेत. पालिका, रेल्वे, राज्य सरकार असेही मुख्यमंत्री म्हणाले. मोगरा, माहुल इथ नवे पंपिंग स्टेशन सुरू होत असल्याचं त्यांनी सांगितलं. मिठी नदी, पोयसर नदी यांची भिंत आणखीन थोडी वाढवण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरुन नजीकच्या वस्त्या जलमय होणार नाहीत असेही मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय नद्यांना फ्लडगेट सुद्धा बसवले जात असल्याचे शिंदे म्हणाले. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
राजकारण करण्याची वेळ नाही, मुख्यमंत्र्यांना मदत करणं गरजेचं
सातही पंपिंग स्टेशन कार्यान्वित झाली आहेत. पाणी तुंबण्याची ही समस्या कायमची संपणार आहे. कोकणात एनडीआरएफच्या टीम तैनात केल्या असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नालेसफाईवरून आज राजकारण करण्याची वेळ नाही, तर आज लोकांना मदत करण गरजेचं असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मीमी पाऊस पडला
मुंबईत काल रात्रीपासून 267 ते 300 मीमी पाऊस पडला आहे. मुंबईत पाऊस 65 मीमी च्या वर झाला की पूरसदृश्य परिस्थिती तयार होते. पण पालिकेनं सकाळपासून चांगलं काम केलं आहे. 441 पंप मुंबईभरात सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हिंदमाता परिसरात तितकं पाणी साचलेलं नाही. तिन्ही रेल्वेमार्ग आता सुरू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.
महत्वाच्या बातम्या: