धुळे : पाकिस्तानच्या तुरुंगात 4 महिने राहिलेले धुळ्याचे 23 वर्षीय जवान चंदू चव्हाण यांनी त्यांच्यावर झालेला अत्याचार समोर आणला. पाकिस्तानमधील तुरुंगात चंदू चव्हाण यांना मानसिक आणि शारिरकदृष्टया वाईट छळ करण्यात आला.


एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीत चंदू चव्हाणांनी पाकिस्तानमध्ये घडलेला एक एक प्रसंग सविस्तर सांगितला. यामध्ये चंदू चव्हाण यांना भारताविरोधी बोलण्यास प्रवृत्तही करण्यात आलं. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंसंदर्भातही वाईट बोललं जात होतं, असेही चंदू चव्हाण यांनी सांगितले.

दोन वर्षापूर्वी भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर 29 सप्टेंबरला ‘37 राष्ट्रीय रायफल्स’ मधील जवान चंदू चव्हाण यांनी नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकच्या हद्दीत प्रवेश केला होता. पाक सैन्याने चंदू चव्हाण यांना अटक केली होती. पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी 21 जानेवारी रोजी चंदू चव्हाण यांना भारत सरकारच्या स्वाधीन केले.

कोण आहेत चंदू चव्हाण?

चंदू चव्हाण मूळचे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर या गावचे आहेत. चंदू 2012 मध्ये सैन्यात भरती झाले. चंदू 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात आहेत. 22 वर्षीय चंदू यांनी सीमा ओलांडण्याच्या दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय रायफल्स जॉईन केलं होतं. चंदू यांचा मोठा भाऊ भूषणदेखील लष्करात आहे. तो सध्या 9 मराठा रेजिमेंटमध्ये कार्यरत आहे.

संबंधित बातम्या :

जवान चंदू चव्हाणांना कारावासाची शिक्षा नाही : सूत्र

पाकिस्तानात गेलेले जवान चंदू चव्हाण यांना भारताकडून 3 महिन्यांची शिक्षा

धुळ्यात परतताच जवान चंदू चव्हाणला अश्रू अनावर

पाकच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या धुळ्यात परतणार!

भारतीय जवान चंदू चव्हाण आमच्याच ताब्यात, पाकिस्तानची कबुली

चंदू चव्हाण यांना परत आणण्यासाठी हालचाली सुरु : मनोहर पर्रिकर

चंदू चव्हाण यांना भारतात नक्की परत आणू: राजनाथ सिंह

पाकिस्तानी लष्कराच्या हाती लागलेला जवान धुळ्याचा