जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. स्वबळाच्या नाऱ्यानंतर येत्या निवडणुकीत जालन्यात रावसाहेब दानवेंना आस्मान दाखवू, असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलं होतं. परंतु शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. युतीनंतर ही जागा भाजपला मिळणार आहे.
तरीही दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यावर खोतकर ठाम आहेत. युती झाली तरीही मी शंभर टक्के जालन्यातून लढणार आणि विजयीच होणार असं म्हणत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंविरोधात शड्डू ठोकला होता. जालन्यात दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे घेतील ते निर्णय अंतिम राहिल, असं ते म्हणाले आहेतं.
जालन्यात दानवेंविरोधात उभा राहून मीच जिंकणार : अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकर काँग्रेसच्या वाटेवर : रावसाहेब दानवे
खोतकरांना पक्षात घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली, दानवेंविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता