हेडलाईन्स:   1. रिओत जिद्दीनं लढलेल्या सिंधूला रौप्य पदकाची कमाई, स्पेनच्या कॅरोलिनाची सिंधूवर मात, बॅडमिंटनमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक, देशभरातून सिंधूवर कौतुकाचा वर्षाव --------------------------------- 2. भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं मायदेशी आगमन, दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत, दीपानं मानले देशवासियांचे आभार --------------------------------- 3. दोषी असल्यास फासावर चढवा, पैलवान नरसिंग यादवची उद्वीग्न प्रतिक्रिया, चौकशीच्या मागणीसाठी पंतप्रधानांकडे दाद मागणार --------------------------------- 4. राज्य सरकारकडून पोलिसांसाठी गुडन्यूज, विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तात असलेल्या पोलिसांना एक महिन्याचा पगार, मुख्यमंत्र्यांची घोषणा --------------------------------- 5. कर्मचाऱ्यांशी निष्ठूरपणे वागणाऱ्या भगवान सहाय यांच्याकडून कार्यभार काढला, माझाच्या बातमीनंतर कारवाई --------------------------------- 6. टेमघर धरण प्रकरणी 33 जणांवर गुन्हे दाखल, अविनाश भोसलेंना वाचवण्यासाठी टेमघर प्रकरणातून सोमा कन्स्ट्रक्शनला वगळलं, आपचा आरोप --------------------------------- 7. बेपत्ता लोकांचा तपास टाळणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार, पोलीस महानिरीक्षकांचे आदेश, डॉ. संतोष पोळला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी --------------------------------- 8. नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अपक्ष नगरसेवक पवन पवारचा भाजप प्रवेश, पवन पवार हा पोलीस कृष्णकांत बिडवे हत्याकांडातला प्रमुख आरोपी --------------------------------- 9. उस्मानाबादमध्ये केवळ खड्ड्यांमुळं महिलेचा गर्भपात, कुटुंबीयांच्या आरोपानं खळबळ, चंद्रकांत पाटील यांची चौकशीची घोषणा