मुंबई : राज्य शासनाने विविध विकास महामंडळं, मंडळं आणि प्राधिकरणांच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवर 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण आणि एका आयोगातील पदाचा समावेश आहे.
महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या नितीन बानगुडे पाटील यांना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मधु चव्हाण यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)चं अध्यक्षपद देण्यात आलं आहे.
नव्याने घोषित केलेल्या नियुक्त्या
1) हाजी अरफात शेख - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
2) जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर - उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग
3) बाळासाहेब ज्ञानदेव पाटील - सभापती, कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ
4) हाजी एस. हैदर आझम - अध्यक्ष, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
5) सदाशिव दादासाहेब खाडे - अध्यक्ष, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण
6) नरेंद्र अण्णासाहेब पाटील - अध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
7) संजय उर्फ संजोय मारुतीराव पवार - उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ
8) आशिष जयस्वाल - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ
9) प्रकाश नकुल पाटील - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
10) नितिन संपतराव बानगुडे-पाटील - उपाध्यक्ष, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ
11) जगदिश भगवान धोडी - उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ
12) उदय सामंत - अध्यक्ष, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)
13) श्रीमती ज्योती दीपक ठाकरे - अध्यक्ष, महिला आर्थिक विकास महामंडळ
14) विनोद घोसाळकर - सभापती, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ
15) विजय नाहटा - सभापती, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ
16) रघुनाथ बबनराव कुचिक - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळ
17) मधु चव्हाण - अध्यक्ष, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)
18) संदीप जोशी - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ
19) प्रशांत ठाकूर - अध्यक्ष, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (सिडको)
20) मो. तारिक कुरैशी - अध्यक्ष, नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ
21) राजा उर्फ सुधाकर तुकाराम सरवदे, अध्यक्ष, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ
म्हाडा अध्यक्षपदी उदय सामंत, सिडको अध्यक्षपदी प्रशांत ठाकूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Aug 2018 08:11 PM (IST)
महाराष्ट्र म्हाडाच्या अध्यक्षपदी शिवसेना आमदार उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर सिडकोच्या अध्यक्षपदी पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांची निवड झाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -