Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory Result : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या शाहू समविचारी आघाडीने बाजी मारत राष्ट्रवादीच्याच आमदार राजेश पाटील पॅनेलचा धुव्वा उडवला. शाहू आघाडीने सरासरी तीन ते साडेतीन हजार मताधिक्यांनी सर्व 19 जागांवर विजय मिळवला. मुश्रीफ यांच्या डॉ. प्रकाश शहापूरकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश चव्हाण, अप्पी पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर व संग्राम कुपेकर यांच्या शाहू समविचारी आघाडीने आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे व शिवाजी खोत यांच्या काळभैरव विकास आघाडीचा धुव्वा उडवला. सभासदांनी एकतर्फी कौल दिला आहे. 


पहिल्या फेरीपासून शाहू आघाडीच्या मताधिक्याचा आलेख वाढत गेला. काळभैरव आघाडीचे स्टार प्रचारक अमर चव्हाण यांच्या विजयाची खात्री असताना त्यांचा अनपेक्षित पराभव झाला. संग्रामसिंह नलवडे यांचाही धक्कादायक पराभव झाला. कामगार नेते शिवाजी खोत यांनाही दोन्ही गटांत पराभवाला सामोरे जावे लागले.


शाहू आघाडीवर दाखवलेल्या विश्‍वासाबद्दल सभासदांचा मी ऋणी असून या विजयाने आघाडीप्रमुख प्रकाश शहापूरकर व प्रकाश चव्हाण यांची जबाबदारी वाढली आहे. सभासदांचा विश्‍वास सार्थ ठरवण्यासह गोडसाखर ऊर्जितावस्थेत आणून सभासद, कामगारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास नवीन संचालक मंडळाचे प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी विजयानंतर दिली. दुसरीकडे, सभासदांचा कौल मान्य असून काळभैरव आघाडीवर विश्‍वास दाखवलेल्या सभासदांचा ऋणी असून  गडहिंग्लजच्या सहकारातील हे शेवटचे मंदिर शेतकऱ्‍यांच्या मालकीचे राहण्यासाठी निवडणूक लढवल्याचे आमदार राजेश पाटील म्हणाले. 


दुसरीकडे क्रॉस व्होटिंगची शक्यता वर्तवण्यात येत होती, पण निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची साऱ्‍यांची आशा फोल ठरवत सभासदांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला एकहाती सत्ता दिली आहे. 


विजयी उमेदवारांना मिळालेली मते 


उत्पादक गट



  • बाळासाहेब देसाई (9,766)

  • डॉ. प्रकाश शहापूरकर (10,400)

  • विश्‍वनाथ स्वामी (9,318)

  • अक्षयकुमार पाटील (9,440)

  • शिवराज पाटील (9,519)

  • अशोक मेंडूले (9,400)

  • प्रकाश चव्हाण (9,267)

  • सतीश पाटील (9,043)

  • रवींद्र पाटील (9,711)

  • सदानंद हत्तरकी (9,848)

  • विद्याधर गुरबे (10,301)

  • भरमू जाधव (9,611)

  • प्रकाश पताडे (9,924)


अनुसूचित जाती



  • काशीनाथ कांबळे (10,484)


महिला



  • मंगल आरबोळे (10,074)

  • कविता पाटील (9,698)


इतर मागासवर्गीय



  • दिग्विजय कुराडे (10,053)


भटक्या विमुक्त



  • अरुण गवळी (10,309)


संस्था प्रतिनिधी



  • सोमनाथ पाटील (199)


इतर महत्वाच्या बातम्या