सांगली: पोलिस दलाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या अनिकेत कोथळे खून प्रकरणी, आता निलंबित पोलिस अधिकारी युवराज कामटेच्या मामेसासऱ्याला काल अटक करण्यात आली आहे.
बाळासाहेब कांबळे असं त्यांचं नाव आहे. त्याला सीआयडीने आज न्यायालयात हजर केलं.
बाळासाहेब कांबळेनं अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी युवराज कामटेला मदत केल्याचं सीआयडीच्या तपासात समोर आलं आहे.
सांगली पोलिसांच्या कोठडीत झालेल्या बेदम मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी पोलिस अधिकारी युवराज कामटेसह अन्य साथीदारांना निलंबित करण्यात आलं असून, ते सांगली पोलिसांच्या अटकेत आहेत.
थर्ड डिग्रीत अनिकेतचा मृत्यू
दरम्यान, पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे या महिन्याच्या सुरुवातीला अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांकडून अनिकेतचा मृतदेह जाळून टाकून, दोन आरोपींनी पालायन केल्याचा बनाव रचण्यात आला होता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक युवराज कामटेसह 5 पोलिसांना अटक करण्यात आली. तसेच या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता.
याप्रकरणात 12 आरोपी पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
हिंगोलीच्या डीवायएसपींनी अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं!
अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती