राळेगणसिद्धी : 'लोकशाहीमध्ये सेवकांचा दर्जा मालकापेक्षा दुय्यम असतो. असं असताना जनता जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाते तेव्हा निवेदन देताना अधिकारी आपल्या खुर्ची मधून न उठता बसूनच निवेदन घेतात. इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल असून तो बंद करण्यात यावा', अशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला विनंती केली आहे.
'बंदिस्त आवार असलेल्या कार्यालयांत जनता निवेदन देण्यासाठी गेटवर जाते. अधिकाऱ्यांनी त्या गेटवर जाऊन जनतेचे निवेदन घेणे आवश्यक आहे. मात्र आज तसे होत नाही', अशी खंत अण्णांनी व्यक्त केली आहे.
अण्णा हजारे यांचं लोकपालसाठी उपोषण सुरु असताना राळेगणसिद्धीतील लोक नगरच्या कलेक्टरला निवेदन देण्यासाठी गेले असताना सरकारी अधिकाऱ्यांनी बसूनच निवेदन घेतले होते. त्यावरून अण्णांनी हा मुद्दा उचलला आहे. 'इंग्रज या देशातून जाऊन 72 वर्षे उलटली आहेत. मात्र इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल आज ही चालू आहे. प्रोटोकॉल म्हणजे लोकशाही वर करणारा आघात आहे असे आम्हाला वाटते. पण सरकारला का वाटत नसावे?' असा प्रश्न अण्णांनी केला आहे.
अण्णा हजारेंचं सरकारी बाबूंच्या प्रोटोकॉलला 'चले जाव'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Feb 2019 03:16 PM (IST)
लोकशाहीमध्ये सेवकांचा दर्जा मालकापेक्षा दुय्यम असतो. असं असताना जनता जेव्हा सरकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाते तेव्हा निवेदन देताना अधिकारी आपल्या खुर्ची मधून न उठता बसूनच निवेदन घेतात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -