Anna Bansode :  विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे याला भाजपने ऑफर दिली होती. ही चर्चा शहरभर रंगलेली असताना, सिध्दार्थ बनसोडे यानेच आपल्याला भाजपकडून थेट ऑफर आल्याची कबुली दिली आहे. याबाबत अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलाने प्रभाग 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी कोणाला द्यायची कोणाला नाही, याबाबतचा सर्वस्वी निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा असल्याचे बनसोडे म्हणाले. अजून अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांची यादी जाहीर केली नाही.  

Continues below advertisement

 कोणाला काय द्यायचं आणि काय नाही हा अजितदादांचा प्रश्न

पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत. कोणाला काय द्यायचं आणि काय नाही. हा दादांचा प्रश्न आहे. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. ज्यांनी मुलाखती दिल्या त्यांना निर्णय झाला नसल्याचं दादांनी सांगितलं आहे. कोणत्याही महिलांचा अपमान झाला नाही. मी आतमध्ये होतो असेही बनसोडे म्हणाले. विधानसभेत प्रभाग 9 मधील इच्छुक उमेदवार बाबा कांबळे यांना महामंडळ देतो म्हणून सांगितलं होतं का? मी कोण त्यांना महामंडळ देणारा असे बनसोडे म्हणाले. येत्या दोन दिवसात अजित पवार सगळं सांगतील असे बनसोडे म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर पिंपरी चिंचवड महापालिकेत आणि पुण्यात अनेकांना संधी मिळेल

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर पिंपरी चिंचवड महापालिकेत आणि पुण्यात अनेकांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल असेही बनसोडे म्हणाले. राष्ट्रवादीत सर्व एकत्रितपणे काम करतील अस माझा ठाम विश्वास असल्याचे बनसोडे म्हणाले. 

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले होते सिध्दार्थ बनसोडे ?

मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. हे समजल्यानंतर मला भाजपसह इतर पक्षांकडून विचारणा झाली, अशी जाहीर कबुली सिध्दार्थ बनसोडे यांनी दिली. पण अजितदादांनी माझ्या वडिलांवर मोठा विश्वास दाखवत, त्यांना विधानसभा उपाध्यक्षपद दिले. त्यामुळे आम्ही अजितदादांशी एकनिष्ठ राहू, असे म्हणत आपण भाजपची ऑफर नाकारल्याचा दावा सिद्धार्थने केला आहे. या सगळ्यावर अद्याप अजित पवार किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याकडून अधिकृतपणे भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, भाजपकडून दोस्तीत कुस्तीच्या या प्रयत्नानंतर अजित पवार काय प्रतिक्रिया देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pimpri Chinchwad Election: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा अजित पवारांना मोठा धक्का द्यायचा प्लॅन बारगळला, विश्वासू नेत्याच्या मुलालाच गळाला लावण्याचा प्रयत्न