मुंबई : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीसाठी समजातील अनेक मान्यवर पुढे आले आहेत. अभिनेत्यांपासून - क्रिकेटपटूंपर्यंत अनेकांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे. आता या यादीत मराठी अभिनेता अंकुश चौधरीचाही समावेश झाला आहे.   अंकुश चौधरीने 'जलयुक्त शिवार' योजनेसाठी 4 लाख रुपये दिले आहेत. अंकुशने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेऊन, चार लाखांचा चेक सुपूर्द केला.   यावेळी आमदार विनायक मेटेही उपस्थित होते.   यापूर्वी प्रशांत दामले, रितेश देशमुख, अक्षय कुमार, क्रिकेटर अजिंक्य रहाणे यांनीही दुष्काळी महाराष्ट्रासाठी मदतीचा हात दिला आहे.   तर अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सर्वात आधी 'नाम' संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसले.