मुंबई: महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिमच्या कथित कॉल प्रकरणात नवी माहिती पुढे येत आहे.  एकीकडे दाऊदच्या फोन कॉलप्रकरणी खडसेंना पोलिसांनी क्लिन चीट दिली असली, तरी दुसरीकडे हॅकर मंगेश भंगाळेची मुंबई पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


 

भंगाळेच्या चौकशीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नसली तरी कॉल लॉग प्रकरणी नवीन माहिती समोर आल्याची बाब पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मान्य केली आहे.

 

पोलिसांच्या चौकशीत कॉल हॅकिंग आणि कॉल लॉगचा तपशील त्यानं मुंबई पोलिसांपुढे सादर केल्याचंही सांगितलं जात आहे.

 

मंगेश भंगाळेनंच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या ४ क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे., असंही त्यानं म्हटलं होतं.

 

यावर मुंबई पोलिसांनी कॉल लॉग तपासून खडसेंना क्लिन चीट दिली.

 

2014 चे 2015 च्या काळात खडसेंना दाऊदच्या नंबरवरुन कॉल आला नाही, वा इकडून कॉल केलाही गेला नाही, असा अहवाल त्यांनी दिला होता. मग, अहवाल दिल्यानंतरही हॅकरची पोलिसांकडून चौकशी कशासाठी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

संबंधित बातम्या

'दाऊद कॉल लॉगप्रकरणी खडसेंची चौकशी होणार', प्रीती मेनन यांची माहिती

खडसेंचा राजीनामा घेऊन चौकशी करा: प्रीती मेनन

दाऊदला कॉल प्रकरणी खडसेंना पोलिसांचा दिलासा

'आप'कडून खडसेंच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न : आंबेडकर

दाऊद इब्राहिम कॉलिंग प्रकरण : एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र