Nanded News : म्हणतात ना.. की माणसाच्या शारिरीक उंची पेक्षा त्याच्या विचारांची आणि कर्तृत्वाची उंची महत्वाची असते, याच उक्तीप्रमाणे अवघी 3 फूट उंची असतानाही वैद्यकीय प्रवेश परीक्षेत (NATIONAL ELIGIBILITY CUM ENTRANCE TEST)   घवघवीत यश संपादन करणाऱ्या नांदेडची (Nanded) अंकिता बोडके (Ankita Bodke) ही विद्यार्थीनी सध्या चांगलीच चर्चेत आलीय.


कोरोना काळात वडिलांचे छत्र हरवलेल्या अंकिताची यशाला गवसणी


अंकिता ही नांदेड शहरातील नमस्कार चौक विस्तारित नाथनगर येथील रहिवासी आहे. कोरोना काळात वडिलांचे छत्र हरवलेली अंकिता आपला भाऊ व आई सह येथे वास्तव्यास आहे. घरी कर्ता पुरुष नसताना व वडिलांचे डोक्यावर छत्र नसताना आपल्या शारिरीक व्यंग्यत्वाला मात देऊन तीने नीट परीक्षेच्या (NEET Exam) हिमालयाची उंची गाठलीय असं म्हटलं तर वावग ठरवणार नाही. स्वतःची उंची केवळ तीन फुटाची असताना हे शारीरिक व्यंग्यत्व बाजूला सारून व मोठ्या धैर्याने तिने नीट परीक्षेत 292 गुण प्राप्त केले आहेत. तर शारीरिक अपंगत्व कोट्यातुन तिने राज्यात सातवा क्रमांक पटकवला आहे. अनेक जण आपल्या उंची अभावी हताश असतात, कमी उंची पाहुन लोक हसतात, लोकं आपणास काय म्हणतील या विवंचनेत राहत असतात. मात्र अंकिताने अशा गोष्टींना दूर ठेऊन व त्याकडे दुर्लक्ष करत सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर (lady doctor) बनण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे अंकिताने आपल्या शारीरिक दुर्बलतेला मात देत स्वकर्तृत्वाने उंची वाढवलीय.


सर्वात कमी उंचीची महिला डॉक्टर (lady doctor) बनण्याचा निश्चय


अंकिता हिला MBBS शिक्षनासाठी मुंबई येथील KEM हॉस्पिटल मध्ये प्रवेश मिळाला आहे. दोन वर्षा पूर्वी अंकिता हिच्या वडिलांचे निधन झाले होते. तरी देखील न खचून जाता वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने ध्येय सुरुच ठेवले. अंकिता ने चित्रकला, नृत्यकलेतही निपुणता दाखवली आहे. तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर एमबीबीएस नतंर कार्डियोलोजिस्ट होण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यामुळे ध्येय पूर्ण करण्यासाठी केवळ मेहनतीचीच गरज असते, हे मी करून दाखवेनच असा दृढविश्वास अंकिताने दाखवलाय.


 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha