Yavatmal: पांढरकवडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील  केळापुर टोल नाक्यावरून जनावर तस्करीचा कंटेनर जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पांढरकवडा पोलिसांनी जनावर तस्करीच्या कंटेनर पकडला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून  23 लाख 49 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पांढरकवडा पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. 


तालिब निज्जर मेह (वय 22), आसिफ एहसान कुरेशी (वय, 30) आणि  कासीम अब्दुल गफार (वय, 22) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या घटनेतील आरोपी ट्रक कंटेनर (क्रमांक NL 01 Q-0921) मध्ये जनावर कोंबून गुरुवार सकाळच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 44 वरून तेलंगणा राज्यात जात होते. यांची माहिती मिळताच पांढरकवडा पोलिसांनी सापळा रचून केळापुर टोल नाक्यावर कंटेनरची चोकशी केली. यावेळी कंटेनरमधून तब्बल 49 म्हशीचे रेडे आढळुन आले. कंटेनर व जनावरासहित पोलिसांनी 23 लाख 49 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय.


यवतमाळ: कळंब शहरात येणारी विदेशी दारू जप्त, कारसह साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त
बाभुळगाव मार्गाने कळंबकडे विदेशी दारू घेवून येणाऱ्या कार पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई गुरूवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास कळंब शहरातील विश्वनाथ कॉलनीत करण्यात आली. मात्र, अंधाराचा फायदा घेत वाहन चालक पळ काढण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांनी जवळपास साडे चार लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. याप्रकरणी पोलिसांनी तपासणी केली असता, बारा पेट्या बियर, वेगवेगळ्या कंपनीची विदेशी दारू आढळून आली. याप्रकरणी कळंब पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.


हे देखील वाचा-