बीड : आंध्र प्रदेशातील लहान बहीण-भावाचा एका महिलेने एक लाख रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये समोर आली आहे. या मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवते अशी बतावणी त्या मुलांच्या आईला करत त्या महिलेने एक लाख रुपयांमध्ये दोन्ही भावंडांना विकण्याचा घाट घातला.
इथं आल्यानंतर घरी परत सोडवा असा हट्ट धरल्यावर या दोघांना मारहाण करून गरम चटके देत अमानुष मारहाण आली. गंभीर जखमी झालेल्या मुलांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला. सध्या या दोन्ही भावंडांवर येथील बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोघांमधील बहीण आठ वर्षांची तर भाऊ दहा वर्षांचा आहे. हे दोघेही मुळचे कडाप्पा (आंध्र प्रदेश) येथील रहिवासी आहेत. ते चौघे जण बहिण भाऊ असून त्यांना वडील नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईच्या ओळखीच्याच एका महिलेने त्यांना हॉस्टेलमध्ये ठेवते, असे सांगत लातूर जिल्ह्यातील चाकूरला आणले. येथे दहा दिवस त्यांच्याकडून काम करून घेतले. या दोन्ही मुलांचा सौदा केला जाणार होता. ही माहिती या मुलांना समजली. त्यावेळी त्यांनी आईकडे जाण्याचा हट्ट धरला. मात्र त्यांना स्पष्ट नकार देण्यात आला. हा मुलगा मोठा असल्याने पळून जाण्याची तयारी करत होता. हे त्या महिलेला समजल्यावर तिने या दोघांनाही बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर गरम वस्तूचे अंगावर चटके दिले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
आपली सुटका होणार नाही, हे त्यांना समजले होते. त्याच रात्री या दोघांनी सर्व झोपेत असताना रेल्वे स्थानक गाठले. रेल्वेत बसून ते परळीला आले. येथे रेल्वे पोलिसांना ही माहिती समजली. पोलिसांनी बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांना माहिती देत दोघांना बीडला आणले. सध्या त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दोन्ही मुलांना अमानुष मारहाण झालेली आहे. हा प्रकार संशयास्पद असल्याने आम्ही गुन्हा दाखल करणार असल्याचे बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितले. या दोन्ही मुलांना गेवराई तालुक्यातील सहारा अनाथालयात दाखल करण्यात आले आहे.
आंध्रातील बहीण-भावाचा लातूरमध्ये एक लाखात सौदा, दोघांना अमानुष मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2019 05:33 PM (IST)
इथं आल्यानंतर घरी परत सोडवा असा हट्ट धरल्यावर या दोघांना मारहाण करून गरम चटके देत अमानुष मारहाण आली. गंभीर जखमी झालेल्या मुलांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढला. सध्या या दोन्ही भावंडांवर येथील बीड जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -