Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची विजयी आघाडी

Andheri Bypolls Result 2022: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे (Andheri Bypolls Results 2022) 3 नोव्हेंबरला मतदान झालं. आज निकाल जाहीर होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Nov 2022 01:59 PM
Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी  विजयी  आघाडी घेतली आहे. अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं मिळाली आहे. 


18 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके - 65335

  • बाळा नाडार - 1485

  • मनोज नायक - 875

  • मीना खेडेकर - 1489

  • फरहान सय्यद - 1058

  • मिलिंद कांबळे - 606

  • राजेश त्रिपाठी - 1550

  • नोटा - 12691


एकूण मतमोजणी  - 85089

Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटकेंना 55946 मतं

Andheri Bypolls 2022 Live Updates:  पंधराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -55946

  • बाळा नाडार -1286

  • मनोज नाईक - 785

  • मीना खेडेकर - 1276

  • फरहान सय्यद - 932

  • मिलिंद कांबळे - 546

  • राजेश त्रिपाठी - 1330

  • नोटा - 10906


एकूण मतमोजणी  - 73007

Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटकेंनी 50 हजार मतांचा तर नोटाच्या मतांनी दहा हजार मतांचा टप्पा ओलांडला

Andheri Bypolls 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल 


चौदाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -52507

  • बाळा नाडार -1240

  • मनोज नाईक - 748

  • मीना खेडेकर - 1190

  • फरहान सय्यद - 897

  • मिलिंद कांबळे - 519

  • राजेश त्रिपाठी - 1291

  • नोटा - 10284


एकूण मतमोजणी  - 68676

Andheri Bypolls 2022 Live Updates: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंची विजय आघाडी , शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष

Shiv Sena Celebration :  ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित आहे हे समजल्यानंतर शिवसेना भवनाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. तर ऋतुजा लटके यांच्या विजयाचां पंढरपुराही सेलिब्रेशन करण्यात आले आहे.   पंढरपुरात  युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश इंगळेंच्या नेतृत्वात शिवसेैनिकांकडून एकच जल्लोष करण्यात आला आहे.  पेढे वाटून फटाक्यांची अतिषबाजी करत विजयाचं सेलिब्रेशन केले आहे. 


पाहा व्हिडीओ


Andheri Bypolls 2022 Live Updates:  अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 59 हजार मतांची मतमोजणी पूर्ण

Andheri Bypolls 2022 Live Updates:  अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 86 हजार मतदान झाले त्यापैकी 59 हजार मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. ऋतुजा लटके यांना 48015 मतं मिळाली आहेत. तर नोटाची मते दहा हजाराचा टप्पा पार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. 


तेराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -48015

  • बाळा नाडार -1151

  • मनोज नाईक - 708

  • मीना खेडेकर - 1156

  • फरहान सय्यद - 859

  • मिलिंद कांबळे - 499

  • राजेश त्रिपाठी - 1211

  • नोटा - 9547


एकूण मतमोजणी  - 63146

Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटके यांचा विजयी आघाडी

Andheri Bypolls 2022 Live Updates:  बाराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -45218

  • बाळा नाडार -1109

  • मनोज नाईक - 658

  • मीना खेडेकर - 1083

  • फरहान सय्यद - 819

  • मिलिंद कांबळे - 479

  • राजेश त्रिपाठी - 1149

  • नोटा - 8887


एकूण मतमोजणी  - 59402

Andheri Bypolls 2022 Live Updates: अकराव्या फेरीनंतर लटकेंकडे मोठी आघाडी, नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं

Andheri Bypolls 2022 Live Updates:  अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.. अकरा फेऱ्यानंतर ऋतुजा लटके मोठ्या फरकानं आघाडीवर आहेत. त्यांना 42343 मतं मिळाली आहेत. 


अकराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -42343

  • बाळा नाडार -1052

  • मनोज नाईक - 622

  • मीना खेडेकर - 948

  • फरहान सय्यद - 753

  • मिलिंद कांबळे - 455

  • राजेश त्रिपाठी - 1067

  • नोटा - 8379


एकूण मतमोजणी  - 55619

Andheri East Bypoll Result 2022 Live:   अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर, दहाव्या फेरीनंतर लटकेंकडे मोठी आघाडी

Andheri East Bypoll Result 2022 Live:  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल 


दहाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -37469

  • बाळा नाडार -975

  • मनोज नाईक - 584

  • मीना खेडेकर - 898

  • फरहान सय्यद - 720

  • मिलिंद कांबळे - 428

  • राजेश त्रिपाठी - 986

  • नोटा - 7556


एकूण मतमोजणी  - 49616

Andheri East Bypoll Result 2022 Live:   नवव्या फेरीअंती लटके यांना 32515 मतं तर नोटाला 6637 मतं

Andheri East Bypoll Result 2022 Live:  नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. नवव्या फेरीतही ऋतुजा लटके आघाडीवर आहेत.  ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित आहे.  नवव्या फेरीअंती लटके यांना 32515 मतं मिळाली आहेत. तर नोटाला 6637 मतं मिळाली आहे.


नवव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  1. ऋतुजा लटके -32515

  2. बाळा नाडार -897

  3. मनोज नाईक - 543

  4. मीना खेडेकर - 863

  5. फरहान सय्यद - 667

  6. मिलिंद कांबळे - 409

  7. राजेश त्रिपाठी - 889

  8. नोटा - 6637


एकूण मतमोजणी  - 43420

Andheri East Bypoll Result 2022 Live: आठव्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर तर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates:  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल 


आठव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -29033

  • बाळा नाडार -819

  • मनोज नाईक - 458

  • मीना खेडेकर - 789

  • फरहान सय्यद - 628

  • मिलिंद कांबळे - 358

  • राजेश त्रिपाठी - 787

  • नोटा - 5655


एकूण मतमोजणी  - 38527

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: सातव्या फेरीनंतर लटकेंना 32998 मतं, अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं

 Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल 


सातवी फेरी एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -24955

  • बाळा नाडार -733

  • मनोज नाईक - 416

  • मीना खेडेकर - 646

  • फरहान सय्यद - 545

  • मिलिंद कांबळे - 312

  • राजेश त्रिपाठी - 679

  • नोटा - 4712


एकूण मतमोजणी  - 32998

Andheri Bypolls 2022 Live Updates: सहाव्या फेरीनंतर लटकेंना 21090 मतं, अपक्ष उमेदवारांपेक्षा नोटाला जास्त मतं

Andheri Bypolls 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी सहाव्या फेरीचे निकाल


सहाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके -  21090

  • बाळा नाडार -674 

  • मनोज नाईक - 398

  • मीना खेडेकर - 587

  • फरहान सय्यद - 448

  • मिलिंद कांबळे - 291

  • राजेश त्रिपाठी - 621

  • नोटा - 4338


एकूण मतमोजणी  - 28447

Andheri Bypolls 2022 Live Updates : पाचव्या फेरीत ऋतुजा लटकेंना 17 हजार 278 मतं

Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील पाचव्या फेरीचा  निकाल जाहीर झाला आहे


पाचव्या फेरीअंती एकूण मतं



  1. ऋतुजा लटके -  17278

  2. बाळा नडार - 570

  3. मनोज नाईक - 365

  4. मीना खेडेकर - 516

  5. फरहान सय्यद - 378

  6. मिलिंद कांबळे - 267

  7. राजेश त्रिपाठी - 538

  8. नोटा - 3859


एकूण - 23771

Andheri East Bypoll Result 2022:  चौथ्या फेरीचे निकाल जाहीर, तिस-या फेरीतील मतांपेक्षा चौथ्या फेरीत लटकेंची 257 मते घटली

Live Andheri East Bypoll Result 2022:  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या चौथ्या फेरीचे निकाल जाहीर आले आहे.  चौथ्या फेरीतही  ऋतुजा लटके  आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर नोटा असून  3580 मतं मिळाली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरील बाळा नडर यांना 505 मतं मिळाली आहे. तिस-या फेरीतील मतांपेक्षा चौथ्या फेरीत ऋतुजा लटकेंची 257 मते घटली आहे


चौथी फेरी 



  • ऋतुजा लटके -  14648

  • बाळा नडार - 505

  • मनोज नाईक - 332

  • मीना खेडेकर - 437

  • फरहान सय्यद - 308

  • मिलिंद कांबळे - 246

  • राजेश त्रिपाठी - 492

  • नोटा - 3580


एकूण - 20548

Andheri East Bypoll Result 2022 Live Update : ऋतुजा लटके यांचा तिसऱ्या फेरीतही डंका, विजयाच्या दिशेनं पुढचं पाऊल

Andheri East Bypoll Result 2022 Live: तिसऱ्या फेरीत देखील ऋतुजा लटके यांनी आघाडी कायम ठेवली आहे. विजयांच्या दिशेनं त्यांनी टाकलेलं हे आणखी एक पाऊल मानलं जात आहे. ऋतुजा लटके यांना तिसऱ्या  फेरीअंती   11361 मतमोजणी मतं मिळाली आहेत.  तर नोटा 2967 मतं मिळाली. ऋतुजा लटकेंना दुस-या फेरीच्या तुलनेत केवळ चार मते अधिक आहेत. तर, नोटाला तिस-या फेरीत दुस-या फेरीपेक्षा 1497 मते अधिक मिळाली आहेत. 


तिस-या फेरीअंती मतमोजणी



  • ऋतुजा लटके -  11361

  • बाळा नडार - 432

  • मनोज नाईक - 207

  • मीना खेडेकर - 281

  • फरहान सय्यद - 232

  • मिलिंद कांबळे - 202

  • राजेश त्रिपाठी - 410

  • नोटा - 2967


एकूण - 16092

Andheri East Bypoll Result 2022 Live: ऋतुजा लटके यांना 12094 मतं, दुसऱ्या फेरीतही आघाडी कायम

Andheri East Bypoll Result 2022 Live: अंधेरी निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीचे  निकाल जाहीर झाले आहे.  आघाडी दुसऱ्या फेरीत देखील कायम आहे. दुसऱ्या लटके  यांना  7817 मते मिळले आहे. तर नोटा मतांचे प्रमाण दुसऱ्या फेरीत देखील कायम असून  1470  जणांनी नोटाला मतदान केले आहे


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल दुसरी फेरी



  • ऋतुजा लटके -  7817

  • बाळा नडार -339

  • मनोज नाईक -113

  • मीना खेडेकर -185

  • फरहान सय्यद -154

  • मिलिंद कांबळे - 136

  • राजेश त्रिपाठी - 223

  • नोटा -1470


एकूण -10437

Andheri East Bypoll Result 2022 Live: पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर तर 'नोटा' दुसऱ्या क्रमांकावर

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पहिल्या फेरी निकाल जाहीर  झाले आहे. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके आघाडीवर आहेत.



  • ऋतुजा लटके- 4277

  • बाला नाडार - 222

  • मनोज नाईक - 56

  • मीना खेडेकवर- 138

  • फरहान सय्यद- 103

  • मिलिंद कांबळे- 79

  • राजेश त्रिपाठी- 127

  • नोटा -622


एकूण मत : 5624


 


 


Andheri East Bypoll Result 2022 Live: ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित

Andheri East Bypoll Result 2022 Live: नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे.  ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंसह सहा उमेदवार रिंगणात ऋतुजा लटकेंचा विजय जवळपास निश्चित आहे. 

Andheri East Bypoll Result 2022 Live: अंधेरी पोटनिवडणुकीतील EVM मधील मतांची मोजणी सुरू, पहिला कल थोड्याच वेळात समोर येणार

Andheri East Bypoll Result 2022 Live:  अंधेरी पोटनिवडणुकीत EVM मधील मतांची मोजणी सुरू झाली आहे. पहिला कल थोड्याच वेळात समोर येणार आहे. पोस्टल मतांची मोजणी सुरू असल्याची माहिती आहे. 

Bypoll Result: देशातील सहा राज्यातील 7 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू

Bypoll Result: देशातील सहा राज्यातील 7 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, हरियाणा, ओदिशा, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पोटनिवडणूक झाली होती.  

Andheri East Bypoll Result 2022 Live: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील पोस्टल मतदानांची मतमोजणी अजूनही सुरू 
Andheri East Bypoll Result 2022 Live: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील पोस्टल मतदानांची मतमोजणी अजूनही सुरू 
Andheri East Bypoll Result 2022 : मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

Andheri East Bypoll Result 2022 : नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.  सुरुवातीला टपाल मतपत्रिकेतील मतमोजणी सुरु झालीय... रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान ३ नोव्हेंबरला पार पडलं. 

Live Andheri East Bypoll Result 2022: पोस्टल मतमोजणीत कोणाला कौल, थोड्याच वेळात होणार स्पष्ट

Live Andheri East Bypoll Result 2022: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातील पोस्टल मतमोजणी सुरू झाली आहे. पोस्टल मतमोजणीत कोणाला कौल मिळतोय हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. 

Andheri East Bypoll Result 2022 Live :  मतदानाची टक्केवारी, पडद्यामागील घडामोडींमुळे धक्कादायक निकाल लागणार?

Andheri East Bypoll Result 2022 Live : अंधेरी पोटनिवडणुकीत  कमी मतदानामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाल्याचं बोललं जातंय. आता प्रत्यक्ष मतमोजणीत नेमकं काय होणार... अंधेरीतील मतदारराजाचा कौल कुणाला मिळणार याचा फैसला अवघ्या काही तासात होणार आहे.

Andheri East Bypoll Result 2022 Live :  टपाली  मतमोजणीला सुरूवात

Andheri East Bypoll Result 2022 Live :  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. टपाली  मतमोजणीला सुरूवात झाली आहे 

Andheri Bypoll Result: थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात

 Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत... मात्र, या शेवटच्या तासांमध्ये निकाल काय लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या निवडणुकीत अत्यंत कमी मतदान झालंय... बहुतांश मतदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र मतदनाच्या दिवशी पाहयला मिळालं.. या निवडणुकीत सात उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत 31.74% इतक मतदान पार पडलं. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच पारड जड असलं तरी काही अनपेक्षित निकाल ही लागू शकतो अशी चर्चा देखील सध्या सुरुय.. 

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates : थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकाल 2022: थोड्याच वेळात मतमोजणी सुरू होणार आहे.

Andheri East Bypoll Result 2022 Live : 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकाल 2022: 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले आणि 31.74% मतदान झाले.

Andheri East Bypolls Result 2022 Live Updates : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकाल 2022 8 वाजता मतमोजणी सुरू होईल

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक निकाल 2022: कडेकोट बंदोबस्तात सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल.

Andheri Bypoll Result: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल

Andheri Bypoll Result: ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीचा निकाल आज लागणार आहे. रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी मतदान 3 नोव्हेंबरला पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल आहे. महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी शासनाच्या विविध विभागांचे सुमारे 22 अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तासाठी 300 पोलीस कार्यरत असतील. सकाळी ८ वाजता टपाल मतमोजणीला सुरुवात होईल

पार्श्वभूमी

मुंबई :  मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' या मतदार संघाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेचा भाग असणाऱ्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज असून  आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यानुसार व्यवस्थापन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे 3 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या मतदानानंतर रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.


या मतमोजणी प्रक्रियेला निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांचे अधिकृत व नोंदणी झालेले प्रतिनिधी देखील उपस्थित असतात.  या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिनिधी म्हणून 15 व्यक्तींना नेमता येते. 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.


आज सकाळी आठ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 8.30 वाजता 'ईव्हीएम' यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी 14 मेज असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे; अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी यानिमित्ताने दिली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.