Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची विजयी आघाडी

Andheri Bypolls Result 2022: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे (Andheri Bypolls Results 2022) 3 नोव्हेंबरला मतदान झालं. आज निकाल जाहीर होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Nov 2022 01:59 PM

पार्श्वभूमी

मुंबई :  मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' या मतदार संघाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेचा भाग असणाऱ्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज असून  आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे....More

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी  विजयी  आघाडी घेतली आहे. अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं मिळाली आहे. 


18 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी



  • ऋतुजा लटके - 65335

  • बाळा नाडार - 1485

  • मनोज नायक - 875

  • मीना खेडेकर - 1489

  • फरहान सय्यद - 1058

  • मिलिंद कांबळे - 606

  • राजेश त्रिपाठी - 1550

  • नोटा - 12691


एकूण मतमोजणी  - 85089