मुंबई: राज्य सरकारमधील कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय सदावर्ते (Gunaratna Sadavarte) एवढी मस्ती करणार नाही, त्याला पाठिंबा देणाऱ्यांचा मी निषेध करतो अशा कडक शब्दात शिंदे गटाचे माजी खासदार आणि को-ऑप बँक एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. एसटी बँकेमध्ये त्याने स्वतःच्या पत्नीचा आणि गोडसेचा फोटो लावला, तो काय चिज आहे हे देशाला माहिती आहे अशीही टीका त्यांनी केली. गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा साधत अडसूळ यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. 


गुणरत्न सदावर्ते यांचे नातेवाईक असलेल्या एसटी बँकेचे व्यवस्थापक सौरभ पाटील यांची राज्य सहकार आयुक्तांनी हकालपट्टी केली. हा निर्णय या आधीच व्हायला हवा होता असं म्हणत अडसूळ यांनी राज्य सरकारचा निषेध केला. ते म्हणाले की, सरकारचा मी घटक आहे. तरीही सरकार निकामी ठरतंय आणि ब्युरोक्रॅसी वरचढ ठरत असल्याचं चित्र आहे. सरकारमधील कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय तो एवढी मस्ती करणार नाही. त्याला पाठिंबा देणाऱ्याचाही निषेध करतो. सरकार दखल घेणार नसेल तर मग आम्ही युनियन काय करतोय ते बघा.


एसटी बँकेत चुकीचे निर्णय, पत्नीचा फोटो लावला


सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय या आधीच घ्यायला हवा होता, तो उशिरा घेतला याबद्दल आनंदराव अडसूळ यांनी सहकार खात्याचा निषेध व्यक्त केला. ते म्हणाले की, तीन महिन्यात एकही मिटिंग का झााल नाही? रिझर्व्ह बँकेनेही यावर काही निर्णय घेतला नाही. सदावर्ते काय चीज आहे हे देशाला माहित आहे. एसटी बँकेत निर्णय चुकीचे घेतले गेले. बँकिंगची समज नसतानाही पत्नीच्या भावाला एमडी केले. बँकेची कणभरही माहिती नाही. कुठलेही निकष नियम न पाळता त्याची निवड केली. 21 वर्षाचा हा मुलगा, ज्याला अनुभव नसताना एमडी पदावर बसवले आणि स्वतःच्या पत्नीचा फोटो लावला बँकेत, गोडसेचा फोटो लावला. 


उदय सामंत यांना ये उदय अशी हाक मारतो, मुख्यमंत्र्यांनी सदावर्तेला हाकलून दिलं होतं, तो सदावर्ते राज्याचे मंत्री उदय सामंत यांना ये उदय अशी हाक मारतोय असं अडसूळ यांनी सांगितलं. 


सदावर्तेंच्या नातेवाईकाची एसटी बँकेतून हकालपट्टी 


मागील तीन ते चार महिन्यात एसटी बँकसंदर्भात मोठ्या घडमोडी घडल्या आहेत. एसटी बँकेतून अंदाजे 480 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेतून काढल्याचे समोर आलं आहे.  त्यानंतर एसटी बँकेच्या संचलाक मंडळानेही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता सहकार खाते सक्रिय झाले असून त्यांनी सौरभ पाटील यांच्यावर मोठी कारवाई केली. सौरभ पाटील यांची एसटी बँकेच्या व्यवस्थापक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलटी एसटी बँकेवर सत्ता आहेत. 


ही बातमी वाचा: