Analysis Of Donations Received By Regional Political Parties : राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी व्यक्ती, संस्था आणि संघटनांद्वारे निवडणूक निधी वापरले जातात. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या मते, शिवसेना, आप, द्रमुक आणि बिजू जनता दल यासह इतर प्रादेशिक पक्षांनी 2019-20 मध्ये 233.685 कोटी रुपयांच्या देणग्या प्राप्त केल्या आहेत.  2019-20 या वर्षात देशभरातील प्रादेशिक पक्षांमध्ये सर्वाधिक निवडणूक निधी शिवसेना पक्षाला मिळाला आहे. देशात सर्वाधिक निवडणूक निधी मिळालेल्या प्रादेशिक पक्षांमध्ये शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे शिवसेनेला अच्छे दिन आल्याचं म्हणावं लागेल. आम आदमी पार्टी या पक्षाला विदेशातूनही निधी मिळाला आहे. 20 हजारांपेक्षा जास्त विदेशातून निधी मिळणारा आप हा एकमेव पक्ष ठरला आहे. 


2019-20 या काळात प्रादेशिक पक्षांना 6 हजार 923 डोनेशन्समधून 233.686 कोटी रुपये निधी मिळाला त्यातील सर्वाधिक 62.859 कोटी रुपये शिवसेनेला मिळाला. ही रक्कम 436 दानांमधून आली होती. त्या खालोखाल अण्णाद्रमुकला 52.17 कोटी, आम आदमी पक्षाला 37.37 कोटी, बिजू जनता दलला 28.20 कोटी तर वायएसआर काँग्रेसला 8.924 कोटी रुपये मिळाले. ADR (असोशिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म) या संस्थेच्या अहवालातील माहिती. 20 हजार रुपयांपेक्षा जास्त निवडणूक दान/निधी/डोनेशन मिळालं तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्याआधारावर एडीआर यांनी ही माहिती प्रसारित केली आहे. वरील पाच प्रादेशिक पक्षांनी देशातील प्रादेशिक पक्षांना मिळणाऱ्या निधीपैकी 81 टक्के निधी प्राप्त केला आहे. आम आदमी पार्टी, एलजीपी, जेएमएस आणि समाजवादी पार्टी यांना मिळणाऱ्या निवडणूक दानांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. 


2018-19 च्या तुलनेत वायएसआर-काँग्रेस, टीआरएस, टीआरएस, टीडीपी, शिवसेना आणि जेडीयू यांच्या निवडणूक निधीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. क्रमश 71.651 कोटी, 40.876 कोटी, 23.573 कोटी रुपये, 7.371 कोटी रुपये आणि 7.098 कोटी इतका निधी कमी झाल्याचं एडीआरच्या सर्व्हेत समोर आलं.  असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात 27 पैकी 16 प्रादेशिक पक्षांनी पॅन कार्डच्या माहितीशिवाय 24.779 कोटी रुपयांचा निधी 1026 जणांकडून घेतला आहे.