Mi punha yein : कुडाळ, सिंधुदुर्ग : सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप कडून होतोय माञ अडचणीत आणणारी व्यक्तीचं अडचणीत येतेय. माणसाला माणसीक छळ देण्याचं काम आणि सरकारला बदनाम करण्याचं छडयंत्र केंद्राच्या एजन्सीच्या माध्यमातून काही लोक करतायत. लवकर सत्तेत जाण्याची घाई झाल्यामुळे या सगळ्या मार्गाचा वापर आणि अवलंब होताना दिसतोय, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर केली आहे. कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामाची जबाबदारी देतोय आणि त्यांना शेवटी कधी मी येणार हे सांगावं लागतं. मी पुन्हा येईन असं म्हटलं की तेव्हा लोक फार हसतात. मी आता ह्या वाक्याला रिप्लेसमेंट काय आहे शोधतोय, मात्र अजून तो शब्द मिळत नाही, म्हणून मी सगळ्यांना सांगतोय मी पुन्हा येईन. असं म्हणत जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, अनिल देशमुखांनी काहीच केलेलं नाही. ते निर्दोष होतीलच. माणसाला मानसिक छळ देण्याचं काम आणि सरकारला बदनाम करण्याचं काम केंदाच्या एजन्सीच्या माध्यमातून काही लोक करतायत. लवकर सत्तेत जाण्याची घाई झाल्यामुळे या सगळ्या मार्गाचा वापर आणि अवलंब होताना दिसतोय. एखाद्या अधिकाऱ्याने मागासवर्गीय समाजाच्या एखाद्या तरुणांची संधी हिरावून घेऊन खोटं सर्टिफिकेट दाखवून नोकरीत प्रवेश केला असल्यास ही फार गंभीर बाब आहे. महाराष्ट्रातील अनेक मागासवर्गीय आरक्षणातून तरुणांना जागा मिळू शकतात, त्यातील एका माणसावर अन्याय झाला असेल. त्यामुळे ते खोटं सर्टिफिकेट असेल तर ते फार गंभीर आहे.
आर्यन खान प्रखरणी समीर वानखेडे विषयी मराठी अमराठी विषय नाही. मग यापूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्यात मराठी अमराठी करायचं असल्यास ईडी ने छगन भुजबळाना २८ महिने तुरुंगात ठेवलं, भुजबळ साहेब मराठी आहेत ना? मेरिटने निर्णय होईल कोणावरही अन्याय होणार नाही. आमचं सरकार निःपक्षपाती पणाने काम करते. आमचे कुणाचेही जे कागदपत्रे पुढे येतायेत ते धक्कादायक आहेत. 25 कोटींची खंडणी गोळा करायची का 18कोटींची करायची हा संवाद एकाने उघड केला आहे. त्यातले 8 कोटी याचे आणि 10 कोटी याने घ्यायचे. हे सर्वच धक्कादायक आहे.