मोदींना राष्ट्रपिता म्हटल्याने अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2019 08:36 PM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख 'राष्ट्रपिता' (Father of our Country) असा केला आहे. यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीका सुरु झाली आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख 'राष्ट्रपिता' (Father of our Country) असा केला आहे. यामुळे अमृता फडणवीस यांच्यावर टीका सुरु झाली आहे. महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता असं संबोधलं जात असताना मोदींचा तसा उल्लेख केल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने मोदींनी देश-विदेशातून आज शुभेच्छा देण्यात येत आहेत. याप्रसंगी अमृता फडणवीस यांनीदेखील ट्विटरवर पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी जे समाजाच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करण्याची प्रेरणा देतात, यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं ट्वीट केलं आहे. या ट्वीटसोबत अमृता यांनी एका रिअॅलिटी शोच्या 'ओ रे मनवा तू तो बावरा है' या त्यांनी स्वतः गायलेल्या गाण्याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर रीट्वीट करत, त्यावर कमेंट्स करत नेटीझन्सनी फडणवीस यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.