अमरावती : मराठवाडा एकीकडे दुष्काळाने होरपळत असताना विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी हजारो लिटर पाण्याची नासाची करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी अमरावतीमध्ये रस्ते चक्क पाण्याने स्वच्छ करण्यात आले.


 

 

मुख्ममंत्री आज रोजगार मेळाव्यासाठी आज अमरावतीला जाणार आहेत. मात्र त्यापूर्वी इर्विन चौक ते पंचवटी चौकपर्यंतचा रस्ता काल हजारो लिटर पाणी टाकून साफ करण्यात आला.

 

 

राज्याच्या काही भागात दुष्काळ आहे, गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत, त्याचवेळी अमरावतीमध्ये मात्र टँकरद्वारे हजारो लिटर पाणी रस्त्यावर टाकलं जात आहे.

 

 

याबाबत प्रशासनाकडून कोणीही बोलायला तयार नाही. मात्र हे पाणी रस्त्यावर कोणी टाकलं याचा शोध प्रशासन घेत आहे.