Amravati News अमरावती : अमरावतीच्या (Amravati News) राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction)अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या इनोव्हा कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काल, सोमवार 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. तर या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीसचे दोन DCP वलगावं पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून पुढील तपास ते सध्या करत आहेत. मात्र या घटणेमुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून प्रत्येक पक्ष त्या अनुषंगाने कामाला लागला आहे. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये घडलेल्या गोळीबारच्या घटनेने अमरावती जिल्हा परत एकदा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत जिल्हा प्रमुखु अरूण पडोळे आणि गोपाल अरबट यांच्या वाद सुरू होता. दरम्यान, त्यातूनच हा वाद अधिक उफाळून येऊन गोळीबाराची घटना घडल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना शिंदे गटाचे शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर हल्ला झाला, असे शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणी केला आणि त्यामागील नेमकं कारण काय? हे तपासणे आता पोलीसांपुढे आव्हान असणार आहे.
फॉरेंसिक टीमकडून गाडीची तपासणी
दरम्यान, या गोळीबारानंतर आता अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेंसिक टीम दाखल झाली आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीची आता फॉरेंसिक टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध वलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पक्षांतर्गत आणि पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वादावरून संपूर्ण प्रकार झाले असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीनंतर आता वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला, अशी तक्रार गोपाल अरबट यांनी पोलिसात केली आहे.
हे ही वाचा