Amravati News अमरावती : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) निकालानंतर देशासह राज्यात भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश न आल्याचे बघायला मिळाले आहे. अशातच राज्यात बहूचर्चित असलेल्या अमरावती मतदारसंघात देखील महायुतीतील (Mahayuti) भाजपच्या (BJP) उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना त्यांच्या दारुण पराभवाला समोर जावे लागले आहे. असे असले तरी या मतदारसंघातील वाद अद्याप शमला नसल्याचे बघायला मिळाले आहे. कारण आज पुन्हा अमरावती मध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले आहे. त्यासाठी कारण ठरले आहे ते जिल्ह्यातील खासदार कार्यालय.
कुलूप तोडून थेट खासदार कार्यालयाचा ताबा
या वेळी झाले असे की, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदारांसाठी शासकीय कार्यालय आहे. त्यामुळे लोकसभेचे खासदार बळवंत वानखडे यांना खासदार कार्यालयाचा ताबा द्यावा, असे वारंवार सांगण्यात आले होते. पण विजयाच्या 17 दिवसानंतर सुद्धा खासदार कार्यालयाचा ताबा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने काँग्रेस आज चांगलीच आक्रमक झाली आहे. खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला.
यावेळी त्यांनी कार्यालयाचा ताबा देण्याची विनंतीही केली, तरीसुद्धा ताबा न दिल्याने त्यांनी थेट खासदार कार्यालय गाठून बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी कार्यालयाचे कुलूप तोडून खासदार कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आक्रमक होत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात आणि प्रशासन हे दडपशाही पणा करत आल्याचा आरोप देखील यशोमती ठाकूर यांनी केला. या प्रकरणामुळे मात्र परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे बघायला मिळाले होते.
यशोमती ठाकूर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर संतापल्या
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर होते. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असतांना काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि त्या सरळ आत गेल्या. यावेळी त्यांनी आम्हाला खासदार कार्यालय का देत नाही म्हणूब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाच जाब विचारला. यावेळी त्या आक्रमक झाल्याचे बघायला मिळाल्या. त्यानंतर संतापलेल्या यशोमती ठाकूर यांनी खासदार कार्यालयाचे कुलूप तोडून हे कार्यकाल आपल्या ताब्यात घेतलं. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने यशोमती ठाकूर आज झाल्या आक्रमक झाल्या होत्या. परिणामी, आज पुन्हा भाजप आणि काँग्रेस मधील वाद अमरावतीमध्ये उफाळून आल्याचे बघायला मिळाले.
इतर महत्वाच्या बातम्या