अमरावती : येत्या 21 डिसेंबरला होणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगर पंचायतच्या निवडणूकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची आज (7 डिसेंबर) शेवटची तारीख असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या निवडणुकीत सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार हे नक्की आहे. 17 सदस्य असलेली तिवसा नगर पंचायत म्हणजे मंत्री यशोमती ठाकूर यांचा मतदार संघ आहे आणि इथं काँग्रेसचं वर्चस्व आहे. दरम्यान निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र मिळून काँग्रेसला आवाहन दिलं आहे. तर भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी मिळून निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे येणाऱ्या 22 तारखेलाच कळेल.

 

दुसरीकडे 17 सदस्य असलेली भातकुली नगर पंचायत म्हणजे् आमदार रवी राणा यांचा मतदार संघ. भातकुली नगर पंचायतवर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचं वर्चस्व आहे. सत्ता पुन्हा कायम ठेवण्यासाठी दोन्ही नेते धडपड करताय तर त्यांना आवाहन आहे ते शिवसेना आणि भाजपचे. यावेळी सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याने सगळ्यांचे लक्ष या भातकुली नगर पंचायतीकडे लागलं आहे.

 

भातकुली नगर पंचायत एकूण जागा - 17


  • युवा स्वाभिमान - 8

  • शिवसेना - 2

  • काँग्रेस - 5

  • अपक्ष - 2


 

तिवसा एकूण जागा - 17


  • काँग्रेस - 10

  • शिवसेना - 4 

  • राष्ट्रवादी - 1 

  • कम्युनिस्ट - 1

  • अपक्ष - 1



संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha