Weather News: उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. तसेच अनेक ठिकाणी बर्षवृष्टी देखील होत आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात होत आहे. राज्यात देखील गारठा चांगलाच वाढला आहे. राज्यात पुणे, सातारा, सांगलीसह नाशिक, उस्मानाबाद याठिकाणी तापमानाचा पार चांगलाच घसरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लोक शेकोट्या पेटवताना दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रातही गारठा वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर महारष्ट्रात विजा आणि गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात  सोलापूरमध्ये तापमान हे 14 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर पुणे-131, सातारा-13.1 , नाशिक-12.3, नांदेड- 13.8, सांगली-13.4, मालेगाव- 13.8, चिकलठाणा 11.7, माथेरान 14.6, उस्मानाबाद-13.6 असे राज्यातील काही जिल्ह्यांचे तापमान आहे. या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईमधील कुलाबामधील किमान तापमान हे 20.0 अंश सेल्सिअस आहे. तर सांताक्रुजमधील तापमान हे 18 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान विभगाने दिली आहे.


 




राजधानी दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून सूर्यप्रकाश पडल्यामुळे लोकांना मोठा दिलासा वाटत होता. मात्र, पुन्हा एकदा दिल्ली-एनसीआरमधील हवामानाचा मूड पूर्णपणे बदलला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि पर्वतीय राज्यांमध्ये झालेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट परत आली आहे. राजधानीत गुरुवारी सकाळी जोरदार वाऱ्यासह चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे थंडी वाढली आहे. हवामान खात्यांच्या अंदाजानुसार दिल्ली-एनसीआरमध्ये आजही हवामानाची स्थिती तशीच राहील. या संपूर्ण महिन्यात लोकांना थंडीपासून दिलासा मिळणार नाही. या महिन्यात पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये देखील थंडीचा कडाका जोरदार वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीत अडथळे यत आहेत.  लखनऊ, कानपूर, बरेली, नजीबाबाद, मुजफ्फरनगर, मेरठ आणि अलीगढ मध्ये पावसामुळे थंडीमध्ये वाढ झाली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: