मुंबई : ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा  मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे.  न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. 


गेल्या काही आठवड्यापासून सुरु असलेला दसरा मेळाव्याचा (Dasara Melava) संघर्ष ठाकरेंनी जिंकला आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड केलं, त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर हक्क सांगत दसरा मेळावा शिवजी पार्कमध्येच (Shivaji Park) घेणार असे प्रयत्न सुरु केले.  उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  कोणत्याच मैदानावर सभा घेण्याची परवानगी मिळू नये, अगदी तसंच झालं.  मुंबई महापालिकेनं कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढे करत, परवानगी नाकारली.  त्यावेळी शिंदे गटाला बीकेसीचं मैदान मिळालं.  पण, उद्धव ठाकरे होल्डवर होते. त्यानंतर थेट उच्च न्यायलय गाठलं आणि आज मैदान जिंकलं आहे. 


कोर्टात काय काय झाल?


शिवसेना युक्तिवाद काय?


2016 च्या अध्यादेशानुसार दसरा मेळाव्याची परवानगी आम्हाला आहे.   दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणं हे शिवसेनेची परंपरा आहे.   गेली अनेक वर्ष मेळावा होतो, त्यामुळे तो शिवसेनेचा अधिकारच आहे. शिवसेना कुणाची हा वेगळा मुद्दा, त्याचा मेळाव्याशी संबंध नाही. दसरा  मेळाव्याचा अर्ज अगोदर कुणी केला आणि नंतर कुणी केला याचा प्रश्नच येत नाही ये थे प्राधान्यक्रमाचा नियम लागू होत नाही. 


महापालिकेचा युक्तिवाद काय?


दसरा मेळावा झाला, तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एखाद्या सार्वजनिक जागेवर कुणीही कायमचा हक्क सांगू शकत नाही. आम्ही कुणाचीही बाजू न घेता तूर्तास कुणालाच परवानगी दिलेली नाही.


सरवणकरांचे वकील 


आम्ही अन्य कुठेही मैदानासाठी परवानगी मागितलेली नाही. खरी शिवसेना कोणती आहे, हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. खरी शिवसेना ही शिंदेंचीच, त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचनशिवाजी पार्कसाठी सर्वात आधी, आम्ही अर्ज केलेला आहे 



उच्च न्यायालय काय म्हणाले? 


खरी शिवसेना कुणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो विषय सर्वोच्च न्यायालय आणि आयगोकडे प्रलंबित आहे.  या निकालाचा त्यांच्या सुनावणीवर परिणाम होणार नाही. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून सुरू आहे.  पण शिवसेनेचा अर्ज फेटाळून पालिकेनं अधिकारांचा दुरूपयोग केला आहे. इतकी वर्षे आयोजन होतं, कधीच गालबोट लागलेलं नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेतली जाईल. सरवणकरांची हस्तक्षेप याचिका आम्ही फेटाळत आहोत. शिवसेनेनं परवानगीसाठी केलेली याचिका मंजूर करत आहोत.


संबंधित बातम्या :


Shiv Sena Dasara Melava Verdict : कोर्टात सत्याचा विजय, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटलं जाईल : विनायक राऊत 


Shiv Sena Dasara Melava Verdict: ठाकरेंचा पहिला मोठा विजय, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी