Dasara Melava : दसरा मेळाव्यावरून सध्या राडा सुरु आहे, त्यात यंदाच्या मेळाव्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार आहेत. पण दसरा मेळ्यावा शिवजी पार्कमध्ये कोण घेणार? याचा वाद हायकोर्टात पोहचला आहे. एकनाथ शिंदे गट, उद्धव ठाकरे आणि बीएमसीमार्फत तिन्ही बाजू हायकोर्टानं ऐकून घेतल्या आहेत. तुम्हाला बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न यावेळी  हायकोर्टानं शिंदे गटाला विचारला.  तसेच इतर मुद्द्यावर युक्तीवाद न करता शिवाजीपार्क आणि दसरा मेळाव्यावर युक्तिवाद करा, अशी सूचनाही हायकोर्टाकडून देण्यात आली. 


आम्हीच खरी शिवसेना, त्यामुळे शिवजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी आम्हाला परवानगी मिळावी, असा युक्तीवाद शिंदे गटाकडून करण्यात आला होता. यावेळी हायकोर्टाकडून सदा सरवणकर यांची हस्तक्षेप करणारी  याचिका फेटाळली. एकप्रकारे हा शिंदे गटाला धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगाच्या याचिकेप्रमाणे युक्तिवाद करु नका, असेही शिंदे गटाला हायकोर्टाकडून बजावण्यात आले. 


बीकेसी मैदानावर ठाकेर गटाच्या वकिलानं युक्तीवाद केल्यानंतर हायकोर्टानं शिंदे गटाच्या वकिलांना तुम्ही इतर कोणत्या मैदानावर परवानगी मागितली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याचि प्रक्रिया काय होती? असा प्रश्नही कोर्टानं शिंदे गटाला विचारला. यावर शिंदे गटाकडून आम्ही रितसर अर्ज केला होता, ज्याप्रमाणे शिवाजी पार्कसाठी अर्ज केला होता, तसाच अर्ज बीकेसीमधील मैदानासाठी केला होता, असा युक्तीवाद करण्यात आला. आम्ही पहिल्यांदा याचिका दाखल केली होती, त्यामुळे आम्हाला परवानगी मिळाली, असेही कोर्टाला सांगण्यात आलं. 


सरवणकरांच्या वकिलांचा युक्तिवाद, नेमकं काय म्हणाले?


याचिकाकर्त्यांचा दावा आहे की हस्तक्षेप अर्जाला अर्थ नाही. मात्र आमची याचिका समजून सांगणं गरजेचं आहे. याचिकाकर्ता म्हणून शिवसेना नोंदणीकृत पक्ष आहे. याचिकाकर्ते दोन म्हणून शिवसेनेचे सचिव अनिल देसाई आहेत. दसरा मेळावा शिवसेनेच्या वतीने घेतला जातो. पक्षप्रमुखांचे विचार ऐकायला कार्यकर्ते न बोलावता येतात. 


याचिकाकर्ते शिवसेना आहेत का हाच खरा प्रश्न आहे? घटनेच्या दहाव्या परिच्छेदानुसार हे स्पष्ट व्हायचं आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. शिवसेना सचिवांनी हे लक्षात घ्यावं की त्यांचं सरकार गेलं, उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाहीत. पक्ष म्हणून कुठे आहोत याचा याचिकाकर्त्यांनी विचार करावा. 


दरवर्षीप्रमाणे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज केला आहे. कुठल्याच दुसऱ्या पक्षाकडून सरवणकर यांनी अर्ज केला नाही.  सरवणकरांच्या अर्जाला अर्थ नाही असं कसं म्हणता येईल? सरवणकर शिवसेनेतच, पक्ष विरुद्ध एक व्यक्ती असं चित्र नाही. सरवणकरांनी पक्ष सोडलेला नाही, लोकांनी त्यांना शिवसेना म्हणून निवडून दिलं आहे. 


सदा सरवणकर यांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. पक्षाचे सचिव बोलतात म्हणून सरवणकरांचे अधिकार कमी होत नाहीत. पक्षासाठी अर्ज करण्याचा सरवणकरांना पूर्ण अधिकार आहे. आम्ही इतर कुठेही परवानगी मागितली नाही.


काय झाला युक्तीवाद?
युक्तिवाद वाढवू नका, आम्हाला आदेशही द्यायचे आहेत, असे म्हणत हायकोर्टाकडून आजच निकाल देण्याचे संकेत मिळाले होते. केवळ दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवरच बोला, अशी सूचना हायकोर्टाकडून करण्यात आली.  तुम्हाला बीकेसी मैदानावर परवानगी कशी मिळाली?असा सवाल हायकोर्टाकडून शिंदे गटाला  विचारण्यात आला. आम्ही केलेल्या अर्जानुसार परवानगी मिळाली, असा युक्तीवाद सरवणकरांच्या वकीलाकडून करण्यात आला. 


निवडणूक आयोगाच्या याचिकेप्रमाणे युक्तिवाद करू नका, असे हायकोर्टकडून सांगण्यात आलं. तुम्ही अन्य कुठे मेळाव्याची परवानगी मागितली आहे का? असा प्रश्नही यावेळी हायकोर्टाकडून विचारण्यात आला. एमएमआरडीए मैदानत त्यांनी आरक्षित केलंय, अशी माहिती ठाकरेंच्या वकिलांनी दिली.  याववर सरवणकरांच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, ही माहिती चुकीची आहे. आम्ही अन्य कुठेही परवानगी मागितली नाही.  


शिवसेनेचे वकील काय म्हणाले?
हा दिवस शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राखीव आहे.  हा इतिहास असल्यानं कुणीही दावा करू शकत नाही.  अर्जाच्या वैधतेवर पालिकेचा आक्षेप नाही, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांकडून करण्यात आला.