Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. थोड्याच वेळापूर्वी ते शिर्डी विमानतळावर दाखल झाले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची बंद दाराआड चर्चा झाली. गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. शिर्डीतील हॉटेल सन ॲन्ड सँड येथे चौघांची बैठक सुरु आहे. राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शाह यांनी आढावा घेतल्याची माहिती मिळत आहे.
बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री आज शिर्डीत मुक्कामी आहेत. हॉटेलवर पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याची शाह यांच्यासोबत चर्चा सुरु केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शाह यांनी आढावा घेतला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण मेट्रो तीन तसेच इतर विकास प्रकल्पांच्या संदर्भात अमित शाहांकडून आढावा घेतला आहे.
उद्या कोपरगावमध्ये शेतकरी मेळावा
उद्या कोपरगावमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्र चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन हे उपस्थित राहणार आहेत. उद्या कोपरगावमध्ये देशातील पहिला सहकारी साखर कारखान्याच्या वतीने, क्रॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने अमित शाह शिर्डीच दाखल झाले आहेत.
शिर्डीतील हॉटेल सन ॲन्ड सँड या हॉटेलवर चर्चा सुरु
दरम्यान, अमित शाह हे शिर्डीत दाखल झाल्यानंतर लगेच शिर्डीतील हॉटेल सन ॲन्ड सँड या हॉटेलवर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या चौघांचीच शिर्डीतील हॉटेल सन ॲन्ड सँड या हॉटेलवर बंददाराआड चर्चा झाली आहे. . दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शाह यांनी आढावा घेतला आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत या चौघांमध्ये चर्चा झाली की नाही याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या:
Amit Shah :बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांचं आवाहन